शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हृदय बंद पडले तर काय कराल

By admin | Updated: October 16, 2015 00:12 IST

भूलशास्त्र संघटनेची जनजागृती : जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त मोहीम

कोल्हापूर : एखाद्या नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याचे हृदय बंद पडले तर काय करायचे, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी त्या रुग्णाची काळजी कशी घायची आणि त्याचे प्राण कसे वाचवायचे हे माहीत हवे. याबद्दलची जनजागृती उद्या, शुक्रवारी ‘जागतिक भूलशास्त्र दिवसानिमित्त’ (दि. १६) भारतीय भूलशास्त्र संघटनेच्या कोल्हापूर शाखेतर्फे शहरातील विविध ठिकाणी एका पथनाट्याद्वारे सादर करून दिली जाणार आहे, अशी माहिती कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. किरण भिंगार्डे यांनी दिली. पथनाट्याची सुरुवात प्रथम महावीर गार्डन येथे सकाळी ७ वाजता होणार आहे. त्यानंतर सकाळी साडेआठला शिवाजी विद्यापीठ, सीपीआर रुग्णालय येथे सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे. याशिवाय भवानी मंडप येथे दुपारी ३ वाजता शेवटचे पथनाट्य सादर केले जाणार आहे. या जनजागृती मोहिमेत सादर केल्या जाणाऱ्या पथनाट्यामध्ये एखाद्याचे हृदय बंद पडले तर त्याच्या नातेवाईकांनी किंवा रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी काय करायचे याबद्दल यामध्ये शिकविले जाणार आहे. हृदय बंद पडले तर प्रथम श्वसननलिकेतील अडथळा दूर कसा करायचा, हे शिकविले जाणार आहे. याशिवाय दुसरी पायरी म्हणून तोंडावाटे कृत्रिम श्वासोच्छ्वास कसा द्यायचा आणि छातीवर दाब देऊन हृदय कसे सुरू करायचे याची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. हे पथनाट्य जागतिक भूलशास्त्र दिनानिमित्त आणि हृदय बंद पडल्यानंतर होणारे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. जास्तीत जास्त लोकांचे प्राण हे केवळ वेळेत उपचार न मिळाल्याने होत आहेत म्हणून अशाप्रकारची जनजागृती संघटनेतर्फे हाती घेतली आहे.