नेसरीत प्रेरणा ज्योतीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST2021-09-02T04:53:46+5:302021-09-02T04:53:46+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटका झालेल्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त प्रेरणा ज्योत नेसरी येथे आली ...

Welcome to the Inspiration Light in Ness | नेसरीत प्रेरणा ज्योतीचे स्वागत

नेसरीत प्रेरणा ज्योतीचे स्वागत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथून सुटका झालेल्या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त प्रेरणा ज्योत नेसरी येथे आली होती. येथील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ ज्योतीचे स्वागत करण्यात आले. ही ज्योत आग्रा ते राजगड ते पारगड अशी नेण्यात येणार आहे.

सामानगड येथून नेसरी बसस्थानक व प्रतापराव गुजर समाधीस्थळी जाऊन ही ज्योत पारगडला रवाना झाली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संघटक संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, सरपंच आशिष साखरे, गंधालीदेवी कुपेकर, प्रकाश दळवी, लक्ष्मण शिंगटे, कृष्णराव वाईंगडे, विलास हल्याळी, यशवंत देसाई, प्रशांत नाईक, प्रतीक क्षीरसागर, राजेंद्र यादव, युवराज दळवी, संजय कांबळे, दयानंद बोरगल्ली, अस्लम बागवान, शहदाद वाटंगी यांच्यासह अन्य उपस्थित होते. स्मारकस्थळी सावतवडी तर्फ नेसरी व कानडेवाडीकरांनी ज्योतीचे स्वागत केले.

फोटो ओळी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे प्रेरणा ज्योतीचे स्वागत विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर व शिवसैनिक यांनी केले.

क्रमांक : ०१०९२०२१-गड-०५

Web Title: Welcome to the Inspiration Light in Ness