राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोल्हापुरात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:12+5:302021-09-10T04:30:12+5:30

सांगली दौऱ्यावर जाण्यासाठी राज्यपाल कोश्यारी आणि केंद्रीय राज्यमंत्री पाटील हे मुंबई येथून कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी रेखावार ...

Welcome to Governor Bhagat Singh Koshyari in Kolhapur | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोल्हापुरात स्वागत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे कोल्हापुरात स्वागत

सांगली दौऱ्यावर जाण्यासाठी राज्यपाल कोश्यारी आणि केंद्रीय राज्यमंत्री पाटील हे मुंबई येथून कोल्हापूर विमानतळावर आले. त्यावेळी त्यांना जिल्हाधिकारी रेखावार यांनी कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याची माहिती दिली. कोल्हापूर, सांगली येथे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबतची माहिती राज्यपाल कोश्यारी यांनी जाणून घेतली. या वेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार शितल मुळे-भामरे, आदी उपस्थित होते. विमानतळावरील स्वागतानंतर दहाच्या सुमारास राज्यपाल कोश्यारी हे सांगलीला रवाना झाले.

फोटो (०९०९२०२१-कोल-राज्यपाल विमानतळ फोटो) : सांगली दौऱ्यावर जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर गुरुवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी शेजारी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

090921\09kol_1_09092021_5.jpg

फोटो (०९०९२०२१-कोल-राज्यपाल विमानतळ फोटो) : सांगली दौऱ्यावर जाण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर गुरूवारी सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले. त्यांचे स्वागत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी शेजारी जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते.

Web Title: Welcome to Governor Bhagat Singh Koshyari in Kolhapur