शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

पंचगंगेत जलपर्णीचा विळखा : नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद ?

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे पंचगंगेचा पाणी उपसा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी इचलकरंजीकरांना लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरास मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून आणि येथील पंचगंगा नदीवरून पाणीपुरवठा होतो. या दोन्ही नद्यांतून होणारा पाणीपुरवठा येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध करून ते पाणी नळाद्वारे शहरवासीयांना दिले जाते. सध्या सुमारे ४५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. मात्र, हे पाणी दोन दिवसांतून एकवेळ किंवा एक दिवसाआड अशा पद्धतीने पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद केला जातो.सध्या पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होऊ लागली आहे. जलपर्णी म्हणजे पाणी दूषित होण्याचे प्रतीक मानले जाते. पंचगंगा नदीतील पाणी अधिक दूषित झाल्यास पंचगंगा नदीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच इचलकरंजीकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी कृष्णा नदीतून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड म्हणजे तीन दिवसांतून एकवेळ होणार असल्याने आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याला जबाबदार कोण?पंचगंगा नदीपात्रामध्ये नदीकाठावर असलेली शहरे व खेडेगावांचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. अशा पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी शुद्ध करण्याची मोहीम सरकारने हाती घेण्याचे ठरविले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनसुद्धा नदीतील पाणी दूषित होऊ नये, याची दक्षता घेतली जाते; पण पंचगंगा नदीघाटावर नागरिकांकडून चारचाकी वाहने व जनावरे राजरोसपणे धुतली जात आहेत. तसेच कपडेही धुतले जातात. त्याबाबत नगरपालिकेकडून डोळेझाक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.