Kolhapur: तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:00 IST2025-07-08T16:00:08+5:302025-07-08T16:00:50+5:30
धामोड : तुळशी धरण परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने आज, मंगळवारी दुपारी २ वाजता धरणातून ५oo क्युसेक्सने पाणी सोडण्यात ...

Kolhapur: तुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
धामोड : तुळशी धरण परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने आज, मंगळवारी दुपारी २ वाजता धरणातून ५oo क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन शाखा अभियंता अंजली कारेकर यांनी केले आहे. धरणात सद्या ७७ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
गेल्या आठवडाभरापासून धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. धरण ७७ टक्के भरले आहे. धरणाच्या वक्राकार दरवाजांचे परिचलन करण्यासाठी व पुरास्थितीचा विचार करून आज, दुपारी तीन वक्राकार दरवाजातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे तुळशी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात धरणक्षेत्रात ७७ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. यावर्षी जूनपासून परिसरात तब्बल १८४० मिली मिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.