शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : नवमतदारांचा दिवस बनला ‘यादगार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:43 IST

लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाल्याबद्दल नव-युवा मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान केले, असे अनेक नवमतदारांनी ठामपणे सांगत सेल्फी काढत सोमवारी विधानसभेतील पहिल्या मतदानाचा दिवस यादगार केला.

ठळक मुद्देमतदारांचा दिवस बनला ‘यादगार’मतदान हे आपले प्रथम कर्तव्य : युवक-युवतींचे मत

कोल्हापूर : लोकशाही बळकट करणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्यास मिळाल्याबद्दल नव-युवा मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतदान हा माझा हक्क आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मी मतदान केले, असे अनेक नवमतदारांनी ठामपणे सांगत सेल्फी काढत सोमवारी विधानसभेतील पहिल्या मतदानाचा दिवस यादगार केला.यंदा पहिल्यांदाच आपणास मतदानाचा हक्क मिळाला आहे आणि मतदान हे आपले प्रथम कर्तव्य असल्याचे जाणून या युवा मतदारांनी अत्यंत अभिमानाने मतदान प्रक्रियेत भाग घेत असल्याचेही सांगितले.आज मतदान केल्यानंतर कर्तव्यपूर्तीचा अभिमान वाटत आहे. माझ्या मैत्रिणींनीदेखील त्यांच्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदान केले. हा एक आनंदाचा क्षण वाटत आहे; त्यामुळे आम्ही सेलिब्रेटही करणार आहोत.- भक्ती वागळेप्रथमच मतदान करत असले तरी आजूबाजूला काय घडत आहे, याची मला पूर्णत: जाणीव आहे. महिलांची सुरक्षितता, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतीविषयक समस्या यांसारखे हे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहेत. ही परिस्थिती बदलण्याच्या दृष्टीने मतदानाच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रयत्न करत आहे.- स्नेहा रावळमाझे पहिले मतदान आहे. आपल्या मतदारसंघाचा व राज्याचा विकास करेल त्याच उमेदवाराला मी मतदान केले आहे. मी माझ्या मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे पार पाडला आहे.- श्रद्धा जाधवमतदानाबाबत लहानपणापासून उत्सुकता होती. यावेळी पहिल्यांदा मतदान करून छान वाटले. शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी लागावी, हीच आमची अपेक्षा आहे.- मीरा सुगंधीयुवकांचे शैक्षणिक प्रश्न सोडविणारा व रोजगार निर्माण करून देणाऱ्या उमेदवाराला मी मतदान केले आहे. पहिल्यांदाच मतदानासाठी केंद्रावर जाताना दडपण आले होते.- काजोल सातर्डेकर

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapurकोल्हापूर