विठ्ठलाई देवी यात्रा उत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST2021-04-10T04:23:01+5:302021-04-10T04:23:01+5:30

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव रोखण्याचा दृष्टिकोनातून शासनाने जाहीर केलेल्या विकेण्ड लॉकडाऊनमुळे आज (शनिवार) दुर्गमानवाड व उद्या (रविवार) कसबा ...

Vitthalai Devi Yatra celebration canceled | विठ्ठलाई देवी यात्रा उत्सव रद्द

विठ्ठलाई देवी यात्रा उत्सव रद्द

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता प्रभाव रोखण्याचा दृष्टिकोनातून शासनाने जाहीर केलेल्या विकेण्ड लॉकडाऊनमुळे आज (शनिवार) दुर्गमानवाड व उद्या (रविवार) कसबा तारळे येथील जागृत देवस्थान श्री गैबी-विठ्ठलाई देवीच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासन, देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने घेतला आहे. सलग दुसर्‍यावर्षीही दोन्ही ठिकाणच्या यात्रा रद्द झाल्याने व्यापारी, छोटे-मोठे व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दूर्गमानवाड येथील श्री विठ्ठलाई देवीची वार्षिक यात्रा आज शनिवारी, तर कसबा तारळे येथील यात्रा उद्या रविवारी होणार होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून देवस्थान कमिटी प्रशासन व ग्रामपंचायतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Vitthalai Devi Yatra celebration canceled