शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वीरेंद्र तावडे याचे तपासात असहकार्य

By admin | Updated: September 5, 2016 00:44 IST

कसून चौकशी : जपमाळ काढून घेतली

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केलेल्या संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (वय ४८, रा. पनवेल, जि. रायगड) याच्याकडे कसबा बावडा पोलिस लाईन परिसरातील एका कक्षामध्ये रविवारी दिवसभर प्रमुख आठ प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. या सर्वांना बगल देत त्याने तपासकामासाठी असहकार्य केल्याने रात्रीपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती उपलब्ध नव्हती. येरवडा कारागृहातून ताबा घेतल्यापासून तावडे राजारामपुरीच्या कोठडीत रात्री व पहाटे काही तास जप करीत असे. त्यातून तो मानसिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याची जपमाळ काढून घेतली. त्यानंतर ती परत द्यावी यासाठी तो विनवणी करीत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येप्रकरणी तावडेला सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. शनिवारी (दि. ३) रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत त्याला ठेवण्यात आले. रात्रभर पोलिस ठाण्यात निरीक्षक अमृत देशमुख, अरविंद चौधरी तळ ठोकून होते. त्यानंतर रविवारी पहाटे प्रातर्विधी झाल्यानंतर त्याला पोलिस मुख्यालयात आणले. या ठिकाणी पोलिसांसह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, (पान ९ वर) या प्रश्नांना बगल पानसरे यांच्या कार्यक्रमांना तू थेट विरोध केला होतास? मडगाव-गोवा बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्रगौंडा पाटील, सारंग अकोळकर, प्रवीण लिमकर, जयप्रकाश हेगडे तसेच भूमिगत असणारा ‘सनातन’चा साधक विनय बाबूराव पवार यांच्या संपर्कात केव्हापासून आहेस? संजय साडविलकर यांना भेटून दोन रिव्हॉल्व्हर तयार करून देण्याची मागणी केली होतीस? त्यासाठी दोन साथीदार पाठविले होतेस? अशी विचारणा केली असता त्याने या प्रश्नांना बगल देत असहकार्य दाखविले.