कोविड नियमांचे उल्लंघन, दोन हॉटेलवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:35+5:302021-04-04T04:23:35+5:30

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, त्याला रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करत आहे. ...

Violation of Kovid rules, action against two hotels | कोविड नियमांचे उल्लंघन, दोन हॉटेलवर कारवाई

कोविड नियमांचे उल्लंघन, दोन हॉटेलवर कारवाई

कोल्हापूर : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून, त्याला रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका शासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करत आहे. रात्री ८ वाजता नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्याबद्दल शहरातील दोन हॉटेल व्यावसायिकांना महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली.

राज्य शासनाने कोविड-१९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालून दिले असून, नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महापालिकेने भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकामार्फत शहरात कारवाई सुरू आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी शहरातील रेस्टॉरंट हॉटेल यांची तपासणी केली. त्यावेळी दोन हॉटेलवर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल केला.

प्रतिभानगर रेड्यांची टकरीजवळील हुतात्मा स्मारक येथे विनापरवाना ज्येष्ठ नागरिकांना घेऊन कार्यक्रम केल्याबद्दल एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी मनीष रणभिसे व अग्निशमनच्या जवानांनी कारवाईत भाग घेतला.

Web Title: Violation of Kovid rules, action against two hotels