महाविद्यालये सुरू करण्याबाबत आज विद्यापरिषदेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:27 IST2021-02-09T04:27:20+5:302021-02-09T04:27:20+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा अहवाल प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीने तयार केला आहे. या ...

Vidyaparishade meeting today to start colleges | महाविद्यालये सुरू करण्याबाबत आज विद्यापरिषदेची बैठक

महाविद्यालये सुरू करण्याबाबत आज विद्यापरिषदेची बैठक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा अहवाल प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे समितीने तयार केला आहे. या अहवालावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यासाठी विद्यापीठ विद्यापरिषदेची बैठक आज, मंगळवारी होणार आहे.

शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील नियमांचे पालन करून दि. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याची सूचना दिली आहे. त्याबाबत विविध अधिविभाग आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील महाविद्यालये कशी सुरू करावयाची, वर्ग कोणत्या पद्धतीने भरवायची, विविध अभ्यासक्रम आणि परीक्षांचे वेळापत्रक स्वरूपाचे कसे राहणार याबाबतचा सविस्तर अहवाल डॉ. कणसे समितीने तयार केला आहे. हा अहवाल विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. या परिषदेच्या मंजुरीनंतर संबंधित अहवाल बुधवारी (दि. १०) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शासन आदेशाच्या अधीन राहून महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सोमवारी दिली.

Web Title: Vidyaparishade meeting today to start colleges