शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बाजाराबाहेर बसण्यास विक्रेत्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल वाहतूक आराखड्यात सूचना (बातमीचा लोगो) १८०२२०२१-आयसीएच-०५ लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : येथील ...

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल

वाहतूक आराखड्यात सूचना

(बातमीचा लोगो)

१८०२२०२१-आयसीएच-०५

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : येथील तीनही आठवडी बाजाराच्या ठिकाणी बाजारालगतच्या रस्त्यांवर भरणाऱ्या बाजाराला आवश्यक दिशा देत ठरवून दिलेल्या ठिकाणीच बाजार भरविणे. रस्त्यावर विक्रेत्यांनी बसू नये. वाहनांचे पार्किंग नियोजित केलेल्या ठिकाणीच व्हावे, अशा सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहराच्या वाहतूक आराखड्यामध्ये दिल्या. 'लोकमत' ने गुरुवारी याबाबत आवाज उठविला होता.

इचलकरंजी शहरामध्ये उडालेला वाहतुकीचा बोजवारा सुरळीत करण्यासाठी पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३ पोटकलम १ (ब) अन्वये रहदारी विनियमनाच्या अधिकारानुसार पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी २२ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२१ या १५ दिवसांकरीता वाहतूक नियम निर्देश जारी केले आहेत. त्यामध्ये सिग्नल व्यवस्था, नवीन एकेरी मार्ग, पार्किंग झोन, नो पार्किंग झोन, सायलेन्स झोन अशा विविध बाबींच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर बाजारादिवशी बाजार भरून आजूबाजूच्या रस्त्यांवर विक्रेते दुतर्फा ठाण मांडून बसतात. त्यामुळे बाजाराच्या दिवशी या मार्गावरील वाहतूक खोळंबते. याबाबत सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत थोरात चौकातील आठवडी बाजार नियोजित खवरे मार्केट येथे भरेल. रस्त्यावर अथवा चौकात रहदारीस अडथळा होईल, असे विक्रेते व हातगाडे किंवा रिक्षावाले थांबणार नाहीत. बाजारात विक्री व खरेदीसाठी येणाऱ्यांनी आपली वाहने मार्केटच्या उत्तर बाजूस असलेल्या रस्त्यावर एका बाजूला पार्किंग करावीत.

उत्तम-प्रकाश चित्रमंदिरसमोरील विकली मार्केटमध्ये नियोजित जागी विक्रेत्यांनी बसावे. लगतच्या रस्त्यांवर बसू नये. तसेच वाहनधारकांनी मार्केटच्या उत्तर बाजूस असलेल्या पूर्व-पश्चिम मार्गावर रहदारीस अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने एका बाजूला पार्किंग करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

१५ दिवसांसाठी राबविल्या जाणाऱ्या या वाहतूक आराखड्यासंदर्भात हरकती किंवा सूचना असल्यास शहर वाहतूक शाखा व पोलीस अधीक्षक कार्यालयात कळवावे, असेही म्हटले आहे.