आत्महत्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शहापूर खणीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:26 AM2021-01-23T04:26:21+5:302021-01-23T04:26:21+5:30

सुशोभीकरण बनले भकास (फोटो) अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहापूर येथील मोठ्या व लहान अशा दोन्ही खणींमध्ये ...

Use of Shahapur mine for suicide and disposal of dead bodies | आत्महत्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शहापूर खणीचा वापर

आत्महत्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शहापूर खणीचा वापर

Next

सुशोभीकरण बनले भकास

(फोटो)

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहापूर येथील मोठ्या व लहान अशा दोन्ही खणींमध्ये पुन्हा प्रदूषित पाणी व केंदाळाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या परिसरातील सुशोभीकरण भकास बनले असून, ओपन जीमही मोडकळीस आली आहे. परिणामी या खणींचा वापर आत्महत्या व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केला जात आहे. याकडे गांभीर्याने पाहून उपाययोजना करण्याची गरज आहे. चार दिवसांपूर्वी शहापूर खणीमध्ये एक अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. उत्तरीय तपासणीनंतर साधारण २२ दिवसांपूर्वी त्याच्या डोक्यात वार करून खून केला असल्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली. त्यानुसार शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्याचा आजतागायत उलगडा झाला नाही. काही वर्षांपूर्वी एका तरुणीचा प्रेमप्रकरणातून खून करून प्रियकराने तिचा मृतदेह एका पोत्यात घालून त्यात दगड घालून या खणीत टाकून दिला होता. चोरीच्या प्रकरणात संशयावरून त्याला ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या कसून चौकशीत त्याने बोलता बोलता खुनाची कबुली दिल्याने त्या प्रकरणाचा उलगडा झाला होता. तोपर्यंत तो मृतदेह सडून गेला होता. असे कित्येक मृतदेह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून या खणीमध्ये टाकण्यात आले असतील, असा प्रश्न निर्माण होतो. सध्या दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी व भरगच्च केंदाळ यामुळे या खणीत काहीही पडले तरी समजून येणार नाही, अशी गंभीर परिस्थिती आहे. त्याचबरोबर कित्येकजणांनी या खणीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचीही नोंद झाली आहे. त्यामुळे केंदाळ काढून चांगले पाणी साठवून या खणीचे संगोपन करणे आवश्यक बनले आहे.

चौकट

काही वर्षेच चांगले संगोपन

पाच वर्षांपूर्वी खणीचा परिसर सुशोभीकरण करून याठिकाणी गणपती विसर्जनही सुरू केले. परंतु सध्या तिकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. यंदा तात्पुरते केंदाळ काढून गणपती विसर्जन मोहीम राबविण्यात आली. परंतु प्रदूषित पाणी व केंदाळ असेच राहिल्यास तेथे विसर्जन बंद होईल. परिणामी पुन्हा मुख्य मिरवणुकीवर ताण येण्याबरोबरच पंचगंगा नदीत विसर्जित होणाऱ्या मूर्तींची संख्या वाढेल.

(फोटो ओळी) २२०१२०२१-आयसीएच-०५

२२०१२०२१-आयसीएच-०६ शहापूरची खणी संपूर्ण दाट केंदाळने व्यापल्यामुळे खेळाचे मैदान दिसत आहे.

२२०१२०२१-आयसीएच-०७ खणीच्या परिसरात सुशोभीकरण करून वॉकिंग ट्रॅक (फिरण्याचा रस्ता) बनविण्यात आला होता. काही ठिकाणी त्यावर गवत व झाडेझुडुपे उगवली आहेत.

२२०१२०२१-आयसीएच-०८ खणीलगत ओपन जीम तयार करण्यात आली आहे. (सर्व छाया-उत्तम पाटील)

Web Title: Use of Shahapur mine for suicide and disposal of dead bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.