शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कामे पूर्ण करण्याऐवजी बंद पाडण्याचा अट्टहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर : कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराच्या विकासकामांसाठी बाराशे कोटींचा निधी आणला; परंतु ही कामे पूर्ण करण्याऐवजी भाजप सरकारच्या ...

कोल्हापूर : कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराच्या विकासकामांसाठी बाराशे कोटींचा निधी आणला; परंतु ही कामे पूर्ण करण्याऐवजी भाजप सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काळम्मावाडी थेट पाईपलाईनसारखी महत्त्वाकांक्षी योजना पूर्णच होऊ नये, असा अट्टहास त्यांनी केला, असा घणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी रात्री केला.

प्रभाग क्रमांक ३३, महालक्ष्मी मंदिर येथील विविध विकासकामांचा प्रारंभ मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार होते.

थेट पाईपलाईन योजनेच्या कामात जाणीवपूर्वक अडवणूक केली. ज्या खात्याचे चंद्रकांत पाटील होते, त्या बांधकाम विभागाचा ना-हरकत दाखलाही त्यांनी मिळवून दिला नाही. विजेच्या खांबांचा स्थलांतर, झाडे तोडण्यासाठी ना-हरकत दिली नाही. त्यांना मी स्वत: भेटून आम्ही निधी दिला; तुम्ही कामे पूर्ण करा, अशी विनंती केली. परंतु गेल्या चार वर्षांत योजनाच पूर्ण होऊ नये, असा अट्टहास केला. त्यामुळे भाजपला मते मागण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, असे मुश्रीफ म्हणाले.

येत्या दिवाळीची कोल्हापूरकरांची पहिली अंघोळ ही काळम्मावाडीच्या पाण्यानेच होईल, असा निर्धार मुश्रीफ यांनी केला. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखडा पूर्ण करण्यासह दोन हजार क्षमतेचा वातानुकूलित हॉल पुढच्या काळात उभारला जाईल. विकासकामांसाठी भरपूर निधी आणू, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले.

अच्युतराव साळोखे यांनी स्वागत केले. आदिल फरास यांनी प्रास्ताविकात प्रभागातील कामांचा आढावा घेतला. आर. के. पोवार यांचे भाषण झाले. यावेळी माजी महापौर हसिना फरास यांचा पाच वर्षांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. सचिन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी शारंगधर देशमुख, निवास शिंदे, इंद्रजित यादव, बाबासाहेब पोवार उपस्थित होते.

(फोटो)