शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बुडणाऱ्या भावाला वाचवताना बहिणीचाही दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

गडहिंग्लज : पाय घसरून विहिरीत बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेरणा मनोहर कांबळे ...

गडहिंग्लज : पाय घसरून विहिरीत बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या बहिणाचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रेरणा मनोहर कांबळे (वय १८) व राजवीर किशोर तराळ (वय ८) अशी दुर्दैवी मृत बहीण- भावांची नाव आहेत. हिडदुग्गी (ता. गडहिंग्लज) येथील हृदयद्रावक घटनेने हलकर्णी पंचक्रोशीसह गडहिंग्लज तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस व ग्रामस्थांतून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी (दि. १०) सायंकाळी प्रेरणा ही आपल्या घराशेजारी असलेल्या खोडगे यांच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. सोबतीसाठी म्हणून राजवीरदेखील तिच्याबरोबर विहिरीवर गेला होता.

धुणे धुऊन झाल्यावर राजवीर हा हातपाय धुण्यासाठी पाण्यात उतरला. त्यावेळी पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला बाहेर काढण्यासाठी प्रेरणासुद्धा पाण्यात उतरली; परंतु दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले.

सायंकाळी बराच वेळ झाला तरी दोघेही घरी परत न आल्यामुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध केली. त्यावेळी दोघेही विहिरीत बुडाल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांना पाण्यातून बाहेर काढून गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

परंतु,उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

प्रेरणा व राजवीर हे दोघे सख्ख्ये चुलत बहीण-भाऊ होत. प्रेरणा ही गडहिंग्लज शहरातील जागृती प्रशालेत १२ वी कला शाखेत शिकत होती. तिच्या पश्चात आई -वडील व विवाहित बहीण असा परिवार आहे. राजवीर दुसरीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी-आजोबा व काका असा परिवार आहे.

मनोहर कांबळे यांच्या वर्दीवरून गडहिंग्लज पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. हवालदार पांडुरंग कुंभार अधिक तपास करत आहेत.

--------

चौकट १) शुभकार्यासाठी आले अन् ...! खासगी कंपनीतील नोकरीमुळे राजवीरचे वडील सहकुटुंब गोव्यात वास्तव्याला आहेत. लहान भाऊ दीपकचे लग्न जमविण्यासाठी काही दिवसांपूर्वी ते गावी हिडदुग्गीला आले आहेत. भावाच्या शुभकार्यासाठी सहकुटुंब गावी आलेल्या किशोर यांच्या एकुलत्या मुलावर काळाने झडप घातली. २) वाढदिवसाच्या आनंदावर विरजण...! शनिवारी (दि. १०) प्रेरणाची मोठी बहीण प्रज्ञा हिचा वाढदिवस होता. घरात वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच झालेल्या प्रेरणा आणि राजवीर यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे.