शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वास ठरावाचे राजकारण रंगणार!

By admin | Updated: November 20, 2015 00:16 IST

इचलकरंजी पालिका : ‘शविआ’ -कॉँग्रेस येणार आमने-सामने

इचलकरंजी : आगामी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीबरोबरच कॉँग्रेसकडून नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर येणाऱ्या अविश्वास ठरावाचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर कॉँग्रेस पक्षाकडून शहरातील जीवनावश्यक विषयांवर बोलविण्यात येणाऱ्या विशेष सभांविषयीसुद्धा कमालीची उत्सुकता आहे. यानिमित्ताने नगराध्यक्षांचे समर्थन करणारी शहर विकास आघाडी व कॉँग्रेस यांच्यात राजकीय कुरघोड्यांचे राजकारण होण्याची शक्यता आहे.इचलकरंजी नगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या बलाबलात कॉँग्रेसचे बहुमत आहे. पालिकेतील ५७ नगरसेवकांपैकी कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक आहेत. अशा स्थितीमध्ये पालिकेमध्ये कॉँग्रेस व राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आहे. त्यामध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पाणी पुरवठा सभापती व आरोग्य सभापती ही पदे कॉँग्रेसकडे, तर बांधकाम सभापती व शिक्षण सभापती ही पदे राष्ट्रवादीकडे आहेत. कॉँग्रेस पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे नगराध्यक्षा बिरंजे यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आणि बंड केले. या बंडाला ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गट यांनी पाठिंबा दिला.नगराध्यक्षांच्या बंडाला दहा महिने झाले. या कालावधीमध्ये नागरिकांची विकासकामे व्हावीत म्हणून कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटाने नगराध्यक्षा यांना सहकार्य करण्याचे ठरविले. मात्र, शहर विकास आघाडी व नगराध्यक्षा सापत्न वागणूक देतात, अशा आशयाच्या जोरदार तक्रारी कॉँग्रेस नगरसेवक-नगरसेविकांच्या आहेत. म्हणून दीपावलीनंतर नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत कॉँग्रेसकडून निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबर शहरास मुबलक व स्वच्छ पाणी देणारी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी नळ योजना, पालिकेच्या आयजीएम दवाखान्याचे हस्तांतरण, भुयारी गटार योजना अशा महत्त्वाच्या विषयांवर विशेष सभा बोलवाव्यात. म्हणून नगराध्यक्षांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे कॉँग्रेसने ठरविले होते.अशा पार्श्वभूमीवर पुढील महिन्यामध्ये पालिकेच्या विविध विषय समित्यांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीकडून इच्छुक नगरसेवक व नगरसेविकांनी फिल्डींग लावली आहे. तसेच बांधकाम समितीचे सभापतिपद नगरसेविकेला मिळावे, अशीही मागणी नगरसेविकांच्या गटाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता दीपावलीचा सण संपला असून, नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाविषयी राजकीय क्षेत्रात उत्सुकता लागून राहिली आहे. (प्रतिनिधी)कॉँग्रेस आणि अविश्वासाची ‘मॅजिक फिगर’नगरपालिकेमधील पक्षनिहाय व गटनिहाय नगरसेवकांचे सध्या तरी नगराध्यक्षांच्यावरील अविश्वास ठराव संमत होण्यासाठीचे बहुमत कॉँग्रेस पक्षाकडे नाही. कॉँग्रेस व जांभळे गट या दोघांचे मिळून ३६ नगरसेवक होतात. तर नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावासाठी ४३ नगरसेवकांची आवश्यकता आहे. हा जादुई आकडा कॉँग्रेसकडून कोणत्या प्रकारे गाठला जाणार, याचीही उत्सुकता आहे.