शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

उखळू ते उदगिरी जंगल सफारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारुण (दि. १५) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारुण (दि. १५) चांदोली राष्टीय उद्यानअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील उखळू ते उदगिरी या २० किलोमीटर अंतराच्या जंगल सफारीचा जलसंपदामंत्री जयंत पाटील व आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयापासून जंगल सफारीचा प्रारंभ झाला. वन्यजीव विभाग चांदोली व उखळू ग्रामविकास समितीतर्फे या जंगल सफरीचे आयोजन केले आहे.

शिराळा तालुक्यातील झोळंबी येथे सध्या २१ किलोमीटर जंगल सफारी सुरू आहे. आता शाहूवाडी तालुक्यातील उखळूपासून उदगिरीपर्यंत ही जंगल सफारी सुरू झाल्याने मणदूरप्रमाणे उखळू येथील स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. जंगल सफारीसाठी १६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी महादेव मोहिते, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, उपअभियंता मिलिंद किटवाडकर व महेश चव्हाण, शाखा अभियंता तानाजी धामणकर, वनक्षेत्रपाल जी. एच. लंगोटे, वनपाल डी. के. यमगर, एच. ए. गारदी, मणदूरचे सरपंच वसंत पाटील, उखळूचे सरपंच राजू मुटल, मोहन पाटील, राजू वडाम, श्रीपती अनुते, संजय वडाम, सदाशिव वडाम, बाजार समितीचे संचालक दिनकर दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट -

प्रवेश शुल्क १२ वर्षांआतील मुलांना १५ व प्रौढ व्यक्ती प्रति ३० रुपये, १२०० रुपये सफारी वाहन व वाहन प्रवेश शुल्क १०० रुपये, गाइड शुल्क २०० रुपये, शैक्षणिक सहलीसाठी शालेय विद्यार्थी १० व महाविद्यालयीन विद्यार्थी २० रुपये प्रत्येकी शुल्क राहणार आहे. उद्यानात प्रवेश वेळ सकाळी ६ ते दुपारी ३ पर्यंत असून गुरुवारी उद्यान बंद राहील. वारणावती येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात पर्यटकांना पास मिळणार आहेत.

- १

हे पाहता येणार तांबवे टॉवर, उदगिरी मंदिर,

कोकण दर्शन.

फोटो:

चांदोली राष्टीय उद्यानअंतर्गत उखळू ते उदगिरी या जंगल सफारीचा प्रारंभ करताना जलसंपदामंत्री जयंतराव पाटील व आ मानसिंगराव नाईक, वनसंरक्षक समाधान चव्हाण व इतर मान्यवर.