शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:31 IST

ऐतिहासिक निवडीला बिनविरोधचे कोंदण

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल देवकरण डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पदे बिनविरोध निवड करीत इतिहास नोंदविण्यात आला. निवड बिनविरोध करण्यासाठी शिव-शाहू विकास आघाडीने आपली उमेदवारी मागे घेत महत्त्वाची भूमिका बजावली.

६५ नगरसेवकांच्या महानगरपालिका सभागृहामध्ये भाजप महायुतीकडे ४७ मतांचा आकडा होता, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडे १७ व उद्धव सेनेचा १ नगरसेवक होता. त्यामुळे दोन्ही पदे भाजपला मिळणार, हे निर्विवाद सत्य असले तरीही निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांकडे विनंती केली होती. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापुरात वास्तव्यास असलेले महायुतीचे सर्व नगरसेवक-नगरसेविका सोमवारी सकाळी इचलकरंजीत आले. अटल बिहारी वाजपेयी चौकापासून थेट चालत त्यांनी सभागृहात प्रवेश केला. पिठासन अधिकारी संजय शिंदे यांनी सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजास सुरूवात केली. 

महापौरसाठी उमेदवारी अर्ज भरलेले शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी महापौरच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या सभेला हरकत घेतली. ७ दिवसांची वेळ देण्याऐवजी २ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. ही वेळ अपुरी आहे. त्यामुळे महापौर निवडीला स्थगिती द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, ही मागणी पिठासन अधिकाºयांनी फेटाळून लावली व सभेच्या कामकाजाला सुरूवात केली.

उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली होती. निवडणुकीवर आक्षेप घेणारे चव्हाण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. धातुंडे यांचा एकच अर्ज राहिल्याने पिठासन अधिकारी शिंदे यांनी धातुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. उपमहापौरसाठी भाजपचे डाळ्या व शिव-शाहू विकास आघाडीच्या संगीता आलासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आलासे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

महानगरपालिकेच्या इतिहासात दोन्ही पदे बिनविरोध करण्यामध्ये सत्ताधाºयांनी यश मिळवले. निवडीनंतर आयुक्त पल्लवी पाटील व पिठासन अधिकाºयांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना धातुंडे म्हणाले, मी माझ्या महायुतीचे ४७ नगरसेवक मानत नाही, तर सर्वच आपले ६५ नगरसेवक आहेत, असे मानतो. नशिबाने व आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे पद मिळाले आहे. आपण हातात हात घालून काम करूया व शहरातील प्रश्न सोडवूया. पाण्यामध्ये राजकारण न करता कोणत्याही परिस्थितीत पाणी येईल, यासाठी प्रयत्न करूया.

डाळ्या म्हणाले, पक्षाने मला संधी दिली आहे. आपण सर्वांनी एकदिलाने इचलकरंजी शहराच्या विकासासाठी काम करूया. रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, मदन कारंडे, तानाजी पोवार अलका स्वामी, रणजित जाधव, ध्रुवती दळवाई, क्रांती आवळे, मनीषा नवनाळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. महायुतीचे नगरसेवक भगवे फेटे बांधून, तर शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक भगव्या टोप्या घालून सभागृहात आले होते. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. तसेच शहरातून मिरवणूक काढली.

नूतन सभागृहाचे उद्घाटन

महापौर निवडीच्या प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला व फित कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आदींनी उपस्थिती लावली.

सत्ता कोणाची लवकर कळणार नाही

महापौर निवडीनंतर शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील हे मनोगत व्यक्त करताना सभागृहातील गटनेते विठ्ठल चोपडे, रवींद्र माने व मी माजी आमदार अशोकराव जांभळे व कारंडे यांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आहे, हे लगेच कळणार नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

सगळ्या मांडवाखालून जाऊ दे

महापौरांनी एक मिनिटसुद्धा वेळ घालवू नये. वरिष्ठ नगरसेवकांचा मान-सन्मान ठेवावा. कामाची माणसे आम्हीच आहोत. वेळ न दवडता लवकर सभा बोलवावी व सगळ्यांना मांडवाखालून घालवावे, असे रवी रजपुते यांनी कोपरखळी मारल्यानंतर सभागृहात हशा पिकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Gets First Mayor: Uday Dhatunde, Anil Daly নির্বাচিত Unopposed

Web Summary : Uday Dhatunde and Anil Daly were unanimously elected as Ichalkaranji's first mayor and deputy mayor, respectively. The Shiv-Shahu Vikas Aghadi withdrew its nomination, ensuring a smooth election for the BJP alliance in the newly formed municipal corporation.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरBJPभाजपा