शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप; अडीच हजार कर्मचाऱ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

कोल्हापूर : वर्ग चारची पदे निरसित करू नये, याबाबतचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा, कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण करू नये, ...

कोल्हापूर : वर्ग चारची पदे निरसित करू नये, याबाबतचा शासन निर्णय तत्काळ रद्द करा, कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण करू नये, शासकीय कार्यालयातील रिक्त पदे सरळ सेवेने भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे शुक्रवारी लाक्षणिक संप करण्यात आला. हा संप शंभर टक्के यशस्वी करीत जिल्ह्यातील अडीच हजारांवर कर्मचारी यात सहभागी झाले, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व शासकीय कार्यालयांमध्ये या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती.

संघाच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत २७ ते २९ जानेवारी दरम्यान राज्यव्यापी आंदाेलन करण्यात आले. पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून काम केले. गुरुवारी दुपारी एक ते दोन या जेवणाच्या सुट्टीत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अखेरच्या दिवशी लाक्षणिक संप करण्यात आला. यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, ट्रेझरी, आयटीआय, पशुसंवर्धन, सिटी सर्व्हे, यासह ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांमधील अडीच हजार कर्मचारी सहभागी झाले. त्यामुळे या कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणींचा सामना करावा लागला.

--

फोटो नं २९०१२०२१-कोल-कर्मचारी निदर्शने

ओळ : कोल्हापुरात शुक्रवारी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे लाक्षणिक संप करण्यात आला. तत्पूर्वी सर्व कर्मचारी टाऊन हॉल परिसरात एकत्र आले होते. (छाया : नसीर अत्तार)

--