शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर प्रोफाईल हॅक करून पैसे उकळण्याचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

रमेश सुतार बुबनाळ :फेसबुकवर मित्रांना मेसेज करत पैशाची मागणी केल्याचा प्रकार सर्वत्र घडत आहे; मात्र मित्राला पैशाची गरज असती ...

रमेश सुतार

बुबनाळ :फेसबुकवर मित्रांना मेसेज करत पैशाची मागणी केल्याचा प्रकार सर्वत्र घडत आहे; मात्र मित्राला पैशाची गरज असती तर तो फोन न करता फेसबुकवर अनोळखी नंबरवर गुगल पे करण्याची विनंती का करतो, असा प्रश्न पडत आहे; मात्र याचा उलगडा थोड्या दिवसांनी झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असाच काहीसा प्रकार शिरोळ तालुक्यात पहावयास मिळत आहे.

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आर्थिक घडी कोलमडली. त्यातच फसवणुकीचे नवनवे प्रकार वाढत आहेत. फेसबुकच्या माध्यमातून मित्र परिवारांचा संपर्क अनेकांचा आहे; मात्र याचाही वापर फसवणुकीसाठी होत आहे. शिरोळ तालुक्यात राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस, डॉक्टर अशा मोठ्या व्यक्तींच्या सोशल मीडियावरील प्रोफाईल अज्ञातांकडून हॅक करण्यात येत आहेत. प्रोफाईल हॅक केल्यानंतर सायबर हल्लेखोरांकडून संबंधित व्यक्तींच्या मित्रांकडे पैशाची मागणी करण्याचा मेसेज केला जात आहे आणि ही मागणी करीत असताना अनोळखी नंबरवर गुगल पे वरून पैसे पाठविण्याचा घाट घातला जात आहे.

आपल्या मित्राला पैशाची गरज आहे, म्हणून तातडीने संबंधितांकडून पैसे पाठविले जातात; मात्र प्रत्यक्षात मित्राला भेटल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येत आहे.

नृसिंहवाडीतील एका डॉक्टर तसेच तालुक्यातील अनेकांची फेसबुक प्रोफाईल हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत; मात्र या मेसेजची चौकशी केली असता, फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे फेसबुकवरून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर संबंधित व्यक्तीला फोन करून अथवा प्रत्यक्षात भेटून खात्री करावी. प्रोफाईल हॅक झाल्यास बंद करावे. अन्यथा मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कोट - फेसबुकवरील माझे प्रोफाईल हॅक करून काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राकडे पैशाची मागणी केली होती; मात्र संबंधित मित्राने मला फोन केल्यावर प्रोफाईल हॅक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. तरी फेसबुकवरून कोणी पैशाची मागणी करीत असेल तर त्या व्यक्तीची चौकशी करावी.

- डॉ. किरण पवार.