शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेळा धनादेश काढूनही दिले नाहीत, कनिष्ठ लिपिकाचा निष्काळजीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 11:57 IST

दोन वेळा धनादेश काढूनही कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना ते न देणारे कनिष्ठ लिपिक बाबूराव कात्रे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका चौकशीमध्ये ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून, आज, शनिवारी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन वेळा धनादेश काढूनही दिले नाहीत, कनिष्ठ लिपिकाचा निष्काळजीपणाकुष्ठरुग्ण हेळसांड प्रकरण, कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर : दोन वेळा धनादेश काढूनही कुष्ठरुग्णांसाठी स्वयंपाक बनविणाऱ्या महिलांना ते न देणारे कनिष्ठ लिपिक बाबूराव कात्रे यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका चौकशीमध्ये ठेवण्यात आला आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला असून, आज, शनिवारी त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.शेंडा पार्क येथील कुष्ठरुग्णांसाठी दोन महिला स्वयंपाक बनवितात. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीतील म्हणजेच वर्षभराचे त्यांचे मानधन अदा करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी गेल्या १० दिवसांपासून स्वयंपाक करणे बंद केल्याने कुष्ठरुग्णांनाच चुलीवर भात-आमटी बनवावी लागत होती. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांना या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानुसार डॉ. देसाई यांनी गुरुवारी दिवसभर चौकशी करून शुक्रवारी अहवाल जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांना सादर केला. ३० मार्च २०१९ रोजी मानधनाचा धनादेश काढला होता; परंतु कात्रे यांनी तो संबंधित महिलांना दिलाच नाही आणि तो मुदतबाह्यही झाला. त्यामुळे पुन्हा ९ आॅगस्ट २०१९ रोजी धनादेश काढण्यात आला. तोही त्यांनी दिला नाही. वर्षभराचे मानधन थकल्याने अखेर या महिलांनी स्वयंपाक करणे बंद केले होते. अखेर गुरुवारी (दि. १४) ८४ हजार रुपयांचा धनादेश दिल्यानंतर या महिला पुन्हा कामावर रुजू झाल्या.

कात्रे यांच्यावर होणार कारवाईकात्रे यांनी कामाकडे दुर्लक्ष, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याने कुष्ठरुग्णांची आहार सेवा विस्कळीत होऊन आरोग्य खात्याची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका अहवालामध्ये कात्रे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्यात येणार असून ती आज, शनिवारी निघेल. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर