शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

खोकुर्ले येथे ट्रकची सायकलला धडक, एक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथे भरधाव ट्रकने सायकलला पाठीमागून धडक दिल्याने बाळू भागोजी कांबळे (वय ७१ ) यांचा जागीच ...

खोकुर्ले (ता. गगनबावडा) येथे भरधाव ट्रकने सायकलला पाठीमागून धडक दिल्याने बाळू भागोजी कांबळे (वय ७१ ) यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा दिनकर बाळू कांबळे यांनी गगनबावडा पोलीस स्थानकात दिली आहे.

अधिक माहिती अशी की, बाळू भागोजी कांबळे हे सायकलवरून दुपारी दोनच्या सुमारास शेताकडे निघाले होते. याचवेळी कोल्हापूरहून गगनबावड्याकडे भरधाव निघालेल्या ट्रकने खोकुर्ले स्मशानभूमीजवळ बाळू कांबळे यांना धडक दिली. त्यामुळे बाळू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी या ट्रकने आणखी एका ट्रकला जोराची धडक देऊन त्या ट्रकचे अंदाजे दहा हजाराचे नुकसान केले आहे. अपघात झाल्यावर अपघाताची वर्दी न देता, ट्रकचालक अरुण लक्ष्मण मिठबावकर ( मु. माळवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) हा पळून गेला.

बाळू कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.या अपघाताची माहिती खोकुर्ले गावचे पोलीसपाटील कैलास इंजर यांना मिळताच त्यांनी गगनबावडा पोलीस स्थानकात याची माहिती दिली. गुन्ह्याचा अधिक तपास पो. हवलदार आर. डी. सौदडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नाईक अनिल पाटील, प्रवीण पाटील, जयदीप बागडी, युवराज बोबडे करत आहेत.

फोटो = बाळू कांबळे