शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरहून येणाऱ्या गाड्या अडविणार

By admin | Updated: January 9, 2015 00:46 IST

नीतेश राणे : संभाजीनगर थांब्याचा निर्णय न बदलल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश बंदी

कणकवली : कोल्हापूर येथून कोकणात येणाऱ्या एस.टी.च्या गाड्या रंकाळा स्थानकाऐवजी संभाजीनगर स्थानकावरून सोडण्याच्या निर्णयाबद्धल १५ जानेवारीपर्यंत तोडगा न निघाल्यास कोल्हापूर येथून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या दाजीपूर येथे अडविण्याचा इशारा आमदार नीतेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत आज, गुरुवारी दिला आहे.
याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास कोल्हापुरातील गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असाही इशारा राणे यांनी दिला.ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरला जाणाऱ्या गाड्या संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच एस.टी.च्या भारमानातही घट झाली आहे. याप्रश्नी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.
३२ फेऱ्यांसाठी आटापिटा
सिंधुदुर्ग एस.टी. विभागातून दररोज एस.टी.च्या ३२ फेऱ्या कोल्हापूर येथे होत असतात. मात्र, या गाड्यांमुळे कोल्हापुरात वाहतुकीची कोंडी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून शहरात असंख्य वाहने दररोज दाखल होत असतात. त्या तुलनेत सिंधुदुर्गमधून एस.टी.च्या कोल्हापुरात जाणाऱ्या गाड्यांची संख्या नगण्य आहे.
त्यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाविरोधात त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे जाणाऱ्या एस.टी.च्या गाड्या संभाजीनगर स्थानकापर्यंत नेण्याच्या निर्णयामुळे सिंधुदुर्ग एस.टी. विभागाच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे. याबाबतचा अहवाल मुंबई येथील एस.टी. प्रादेशिक कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. तसेच या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला आहे. मात्र, याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच घेण्यात येईल, अशी माहिती एस.टी.चे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.


कोंडी कमी करण्यासाठी
कोल्हापूर शहरातून कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एस.टी. गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आला आहे. कोकणातून येणाऱ्या काही एस.टी. बसेस मध्यवर्ती बसस्थानकापर्यंत न येता संभाजीनगर बसस्थानकापर्यंत येतील व तेथूनच पुन्हा कोकणात जाणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०१५ पासून लागू झाली आहे.


१५ ते ८० रुपये भुर्दंड
पणजी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, राधानगरी, देवगड, गगनबावडा डेपोंच्या गाड्या, विजयदुर्ग या प्रमुख गाड्यांतील प्रवाशांना शहरात येण्यासाठी संभाजीनगर येथे उतरावे लागणार आहे. येथे शहरात येण्यासाठी रिक्षा किंवा के.एम.टी.बसचा आधार घ्यावा लागणार आहे. यामुळे कमीतकमी १५ ते ८० रुपयांपर्यंत आता जादा पैसे मोजावे लागत आहे. तसेच गगनबावडामार्गे मध्यवर्ती बसस्थानकावरून पुढे मार्गस्थ होणाऱ्या गाड्यांचे किलोमीटर वाढल्याने त्यांच्या तिकिटाच्या दरामध्ये नऊ रुपयांची वाढ झाली आहे.