शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या बंदने दीड कोटींची उलाढाल ठप्प

By admin | Updated: July 5, 2016 00:03 IST

नियमनमुक्तीला विरोध : फळांसह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; बाजार समितीत शुकशुकाट

कोल्हापूर : फळे व भाजीपाला नियमनमुक्ती विरोधात सोमवारी अडते, व्यापाऱ्यांनी एल्गार पुकारल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद राहिले. यामध्ये भाजीपाला, फळांसह कांदा-बटाटा व्यापारी सहभागी झाल्याने समितीमधील सुमारे दीड कोटींची उलाढाल ठप्प झाली. राज्य सरकारने भाजीपाला व फळे नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समित्यांच्या बाहेर शेतकऱ्यांना आपला माल विकता येणार असल्याने याविरोधात व्यापारी व अडते आक्रमक झाले आहेत. माथाडी कामगारांनी सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. व्यापारी व अडते यांनी कामकाज बंद ठेवले तर बाजार समिती संघानेही या संपात उडी घेतल्याने संपूर्ण कामकाज ठप्प झाले. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दिवसाला साधारणत: दीड कोटींची उलाढाल होते. फळे, भाजीपाला मार्केट सह कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनीही संपात सहभागी झाल्याने समिती परिसरात शुकशुकाट दिसत होता. नियमनातून फळे, भाजीपाला वगळण्याचा निर्णय अन्यायीहमाल पंचायत : उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनकोल्हापूर : हमाल, मापाडी यांचा विचार न करता, शासनाने बाजार समितीमधील नियमनातून फळे व भाजीपाला आदी शेतीमाल वगळला आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापूर जिल्हा हमाल पंचायतने ‘काम बंद’ ठेवून निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांना याचे निवेदन देण्यात आले.उपाध्यक्ष आण्णाप्पा रामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील दीडशेहून अधिक जणांच्या व्यापक शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.शासनाने हा निर्णय घेताना हमालांना विश्वासात घेतलेले नाही. शेतकरी ते ग्राहकांची भेट घडविण्याचा शासनाचा इरादा दिशाभूल करणारा आहे. त्यात शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. बाजार समितीमधील माल न आणता खुल्या बाजारात माल विक्री ही बाब वाटते तितकी सोपी नाही. बाजार समितीचे परवानाधारक हमाल, महिला, कष्टकरी कामगार नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने विचार आणि कृती करतो. आमच्या भविष्याचा विचार न करता शासनाने अन्यायी धोरण स्वीकारले आहे. हे तत्काळ मागे घ्यावे. शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव मिळवून देण्याची जबाबदारी ही शेतीमाल बाजार समितीने घेतली पाहिजे. शेतीमालाचा हमीभावाने खाली लिलाव जाणार नाही. याची दक्षता घेऊन प्रसंगी हमी फंडातून शेतकऱ्याला आर्थिक हमी दिली पाहिजे. शेतीमाल बाजार समित्यांमध्ये हमी फंडाची उभारणी व्हायला हवी. शिष्टमंडळात सरदार रोहिले, कृष्णात चौगले, गणपती पाटील, संभाजी खांडेकर, गोरख लेंडवे, विनोद बोरे, बापू आडूळकर, रूद्राप्पा तेली, शिवपुत्र शिरजगी आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)