शिरोळ संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:25 IST2021-02-16T04:25:12+5:302021-02-16T04:25:12+5:30

शिरोळ : शिरोळ विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिरोळचे नगरसेवक तातोबा पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश ...

Top Brief News | शिरोळ संक्षिप्त बातम्या

शिरोळ संक्षिप्त बातम्या

शिरोळ : शिरोळ विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शिरोळचे नगरसेवक तातोबा पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून पाटील हे काँग्रेसचे काम करत आहेत. या निवडीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले. संघटन मजबूत करून पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०१-तातोबा पाटील

--

प्रथमेश नलवडे भारतीय नौदलात शिरोळ : येथील प्रथमेश मोहन नलवडे याची भारतीय नौदलमध्ये टेक्निकलपदी निवड झाली. जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रथमेश याने हे यश मिळविले. त्याला प्रा. विक्रम भोसले यांच्यासह पालकांचे मार्गदर्शन लाभले. प्रथमेश हा सिव्हील इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून त्याने पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळविले आहे.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०२-प्रथमेश नलवडे -

----------

आज दातेगडावर स्वच्छता मोहीम

दानोळी : स्टुडंट पॉवर ग्रुपच्यावतीने व्हॅलेंटाईन दिनाचे औचित्य साधून आज, मंगळवारी किल्ले दातेगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दरवर्षी या ग्रुपकडून ही मोहीम राबविली जाते तरी शिवभक्तांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रुपकडून करण्यात आले आहे.

Web Title: Top Brief News