शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून बहरणार तरुणाईचा कलाविष्कार

By admin | Updated: October 10, 2014 23:02 IST

आजपासून प्रारंभ : जतच्या राजे रामराव महाविद्यालयाला यजमानपद

कोल्हापूर : कलेच्या सप्तरंगांची चौफेर उधळण करणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा प्रारंभ उद्या, शनिवारी होणार आहे. जत (जि. सांगली) येथील राजे रामराव महाविद्यालयात होणाऱ्या महोत्सवात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील २८० महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी लोकनृत्य, सुगम गायन अशा २८ प्रकारांमधून कलाविष्कार सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना राष्ट्रीय महोत्सवासाठी प्रवेश मिळवून देण्याच्यादृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण आहे. यावर्षीचा ३४व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे यजमानपद प्रथमच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालयाला मिळाले. त्यामुळे महाविद्यालयाने जय्यत तयारी केली आहे. महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, जतच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजित डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, महाविद्यालयात आज, शुक्रवारी महोत्सवाची तयारी युद्धपातळीवर सुरू होती. रंगमंचांच्या तयारीवर अखेरचा हात फिरविण्यात येत होता. दुपारनंतर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील संघ, स्पर्धक येण्यास प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत संघ महोत्सवाच्या ठिकाणी येत होते. (प्रतिनिधी)महोत्सवात आज...मूकनाट्य, भारतीय समूहगीत, लघुनाटिका, लोककला, लोकनृत्य, सुगम गायन, पाश्चिमात्य एकत्र गायन, वक्तृत्व, वाद-विवाद, शास्त्रीय तालवाद्य आणि सूरवाद्य, एकांकिका, पथनाट्य, स्पॉट फोटोग्राफी, रांगोळी, मातीकाम, स्थळचित्रण, कातरकाम या स्पर्धा होतील.दुर्गम आणि दुष्काळी  परिसर असलेल्या जतमध्ये आमच्या महाविद्यालयाने स्थापनेची ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. येथील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांसह नागरिकांना तरुणाईचा कलाविष्कार पाहता यावा. तसेच त्यातून त्यांच्यामध्ये कलेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने आम्ही मध्यवर्ती युवा महोत्सवाचे आमच्या महाविद्यालयात आयोजन केले आहे. - प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर (राजे रामराव महाविद्यालय)