शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

सण-उत्सवातून तंबाखूविरोधी जनजागृती

By admin | Updated: March 11, 2015 00:04 IST

८७ जणांना केले तंबाखूमुक्त : सडोली खालसातील संत गोरा कुंभार तरुण मंडळ, छत्रपती बॉईजचा उपक्रम

संतोष मिठारी -कोल्हापूर  -रक्षाबंधन, गुढीपाडवा, गणेशोत्सव, आदी सण-उत्सवांच्या माध्यमातून वर्षभर तंबाखूविरोधी जनजागृतीचा उपक्रम सडोली खालसा (ता. करवीर) येथील तरुणाई राबवीत आहे. या गावातील संत गोरा कुंभार तरुण मंडळ व छत्रपती बॉईज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांत सुमारे ६० हजार लोकांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती केली आहे. शिवाय ८७ जणांना सिगारेट, बिडी, तंबाखू, आदींच्या व्यसनातून मुक्त केले  आहे. या गावातील प्राथमिक शिक्षक एकनाथ कुंभार यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी सलाम मुंबई फौंडेशनचे तंबाखूविरोधी जनजागृतीचे शिबिर पूर्ण केले. तंबाखूविरोधी जनजागृती करण्याचा विचार त्यांनी संत गोरा कुंभार तरुण मंडळ व छत्रपती बॉईजमधील कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केला. या कार्यकर्त्यांनी त्याबाबत सकारात्मकता दाखविली. त्यानंतर कुंभार व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सण-उत्सवांच्या माध्यमातून तंबाखूविरोधी जनजागृती सुरू केली. यात तंबाखूमुक्त घरासाठी उंच गुढी स्पर्धा, गणेशोत्सवातील आकर्षक सजावट, रांगोळी व भित्तिचित्र स्पर्धा, तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी दुकानदारांचे रक्षाबंधन, शालेय विद्यार्थ्यांची रॅली असे उपक्रम राबविले जातात. त्यासह विविध गावांमधील लग्नसोहळ्यातदेखील जनजागृती केली जाते. त्याचा सकारात्मक परिणाम असून, आतापर्यंत या चळवळीतून ८७ जण व्यसनमुक्त झाले. काही दुकानांनी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद केली आहे. यात्रा, नंदवाळ येथील आषाढवारीत पत्रकांचे वाटप, पथनाट्य, फलकांद्वारे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवने शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन केले जाते. कॅन्सर डे, नो स्मोकिंग डे, आदी विशेष दिनांनिमित्त शालेय विद्यार्थ्यांची परिसरातील गावांमध्ये रॅली काढण्यात येते. आतापर्यंत त्यांनी तंबाखूविरोधात सुमारे ६० हजार लोकांचे प्रबोधन केले आहे. ग्रामीण भागातील या मंडळांचा उपक्रम विकासाची दिशा समजल्या जाणाऱ्या शहरांसाठी आदर्शवत ठरणारा आहे. सिगारेट सोडल्यास चांगली झोपफ्लोरिडा विद्यापीठ आणि रिसर्च ट्रायंगल पार्क यांनी संयुक्तपणे सिगारेटच्या व्यसनाचा आणि झोपेवर होणारा परिणाम याबाबत संशोधन केले. या संशोधनानुसार सिगारेट सोडल्यास संबंधित व्यक्तीला चांगली झोप लागू शकते, असे स्पष्ट झाले आहे. सिगारेट ओढणाऱ्यांपैकी ११.९ टक्के लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो आहे. यापैकी १०.६ टक्के लोकांना रात्री झोपेतून जाग येते, तर ९.५ टक्के लोकांना पहाटे खूप लवकर जाग येते. सिगारेट ओढण्याचे व्यसन असलेल्या व्यक्तीने दिवसातून एकदा ती ओढल्यास त्याची झोप १.२ मिनिटांनी कमी होते. ज्याप्रमाणे तो दिवसातून एकापेक्षा जास्त सिगारेट ओढतो, त्याचप्रमाणे त्याची झोप कमी-कमी होत जाते, असे या संशोधनात आढळून आले आहे. करवीर तालुक्यातील शाळा आणि विविध गावे तंबाखूमुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे. त्या दृष्टीने आम्ही कार्यरत आहोत. जनजागृती, प्रबोधनाच्या कार्यात जनस्वास्थ्य दक्षता समिती आणि सलाम मुंबई फौंडेशनचे मार्गदर्शन लाभते. तंबाखूविरोधी चळवळीचा चांगला परिणाम होत असून, तिची व्याप्ती वाढत आहे. प्रबोधनासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्यासाठी व्हॉट्स-अ‍ॅपवर ‘टोबॅको फ्री कोल्हापूर’ ग्रुप सुरू केला आहे. यात चळवळीत काम करणाऱ्या तालुक्यातील ५० शिक्षकांचा समावेश आहे. त्याद्वारे कार्यक्रमांचे नियोजन केले जाते.- एकनाथ कुंभार (शिक्षक, केंद्रशाळा हसूर दुमाला)