ग्रामपंचायतीचा करवसुलीसाठी वेळवट्टीत कॅशलेस सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:42 IST2021-02-06T04:42:32+5:302021-02-06T04:42:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : आजरा तालुक्यातील वेळवट्टी ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी अनोखी संकल्पना राबविताना ग्रामस्थांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून ...

Timely cashless facility for Gram Panchayat tax collection | ग्रामपंचायतीचा करवसुलीसाठी वेळवट्टीत कॅशलेस सुविधा

ग्रामपंचायतीचा करवसुलीसाठी वेळवट्टीत कॅशलेस सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क

आजरा : आजरा तालुक्यातील वेळवट्टी ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी अनोखी संकल्पना राबविताना ग्रामस्थांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वेळवट्टी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, या ग्रामपंचायतीने जिल्ह्यात करवसुलीसाठी नवीन आदर्श घालून दिला आहे. येथील कॅशलेस सुविधेचा प्रारंभ गटविकास अधिकारी बी. डी. वाघ व साखर कारखाना संचालक सुधीर देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

करवसुली रोखीने न करता थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर पैसे जमा व्हावेत. नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये येऊन पैसे भरणे शक्य होत नाही, त्यामुळे स्वाईप मशीनच्या सहाय्याने खात्यावर रक्कम जमा व्हावी, या हेतून कॅशलेस सुविधा सुरू केल्याचे ग्रामसेवक संदीप चौगुले यांनी सांगितले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, कारखाना संचालक सुधीर देसाई, सहाय्यक गटविकास अधिकारी पी. बी. जगदाळे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. डी. माळी, पी. जी. चव्हाण, एस. टी. कराळे, सरपंच मनिषा देसाई, सदस्य इंद्रजीत देसाई, शिवाजी कुंभार, प्रकाश पोवार, अंबूबाई सुतार, स्वाती कुंभार, वर्षा निकम यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, मुख्याध्यापक उपस्थित होते. शामबाला निकम यांनी सूत्रसंचालन केले तर इंद्रजीत देसाई यांनी आभार मानले.

ग्रामपंचायतीने घेतले स्वाईप मशीन

कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वत:च्या खर्चाने स्वाईप मशीन खरेदी केले आहे. तर करवसुलीसाठी ग्रामसेवक व कर्मचारी घरोघरी जावून कॅशलेस व्यवहाराची माहिती देणार असून, करवसुली करणार आहेत.

---

* फोटो ओळी : वेळवट्टी (ता. आजरा) येथे ग्रामपंचायतीच्या कॅशलेस सुविधेचा प्रारंभ गटविकास अधिकारी बी. डी. वाघ यांनी केला. यावेळी पी. बी. जगदाळे, संदीप चौगुले आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०४०२२०२१-गड-०१

Web Title: Timely cashless facility for Gram Panchayat tax collection