थांबलेल्या ट्रकला कारची धडक, चिमुकल्यासह दोघे जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 17:32 IST2026-05-11T17:29:33+5:302026-05-11T17:32:39+5:30
कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला

थांबलेल्या ट्रकला कारची धडक, चिमुकल्यासह दोघे जखमी; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर झाला अपघात
आंबा : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील तळवडे येथे थांबलेल्या ट्रकला कारची जोरात धडक बसून तिघे जखमी झाले. अनिश अतुल पलांडे (वय ४), सोनाली अतुल पलांडे (३०) आणि विजय गोपाल वेरुणकर (५४, सर्व रा. महाड) अशी जखमींची नावे आहेत.
यातील सोनाली पलांडे यांच्या डोक्याला मोठा रक्तस्राव झाला आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान अपघात झाला. स्थानिक तरुणांनी जखमींना येथील दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार केले. त्यानंतर त्यांना कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, पलांडे कुटुंब हे नातेवाइकासह कारमधून कोल्हापूरहून रत्नागिरीकडे निघाले होते. तळवडे येथे आले असता चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट थांबलेल्या ट्रकला धडकली. धडक इतकी जोरात होती की, कारच्या पुढील बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमध्ये पुढे बसलेल्या सोनाली पलांडे यांच्या डोक्याला मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला आहे. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात झाली आहे.