जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST2021-07-10T04:17:21+5:302021-07-10T04:17:21+5:30

कोल्हापूर : इस्पूर्लीसह कागल, करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरदस्तीने महिलांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात इस्पूर्ली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ...

Thief arrested for robbery | जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला अटक

जबरी चोऱ्या करणाऱ्या चोरट्याला अटक

कोल्हापूर : इस्पूर्लीसह कागल, करवीर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरदस्तीने महिलांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्याला पकडण्यात इस्पूर्ली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना यश आले आहे. दरम्यान, गुन्हा घडल्यापासून या चोरट्याला ७२ तासात पोलिसांनी जेरबंद केले असून, उत्तम राजाराम बारड (रा. धामोड, ता. राधानगरी) असे संशयिताचे नाव आहे.

इस्पूर्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ५) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संशयिताविरोधात दुखापत करून जबरी चोरी केल्याबाबतचा गुन्हा नोंद झाला. त्यानंतर कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिध्दनेर्ली येथेही दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि. ६) अशाच प्रकारचा गुन्हा नोंद झाला. यासह दऱ्याचे वडगाव (ता. करवीर) येथेही जबरदस्तीने सोन्याचे मणीमंगळसूत्र चोरल्याची घटना घडली होती. याबाबत इस्पूर्ली पोलिसांनी तपास गतिमान करून संशयितापर्यंत माग काढला. त्यात संशयित बारड याचे नाव निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिन्ही ठिकाणी केलेल्या जबरी चोऱ्यांची माहिती पुढे आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, सहाय्यक फौजदार पी. पी. पाटील, ए. आर. देसाई, ए. वाय. मर्दाने, डी. डी. पाटील, डी. एस. कुंभार, युवराज मनोहर पाटील यांनी केली.

Web Title: Thief arrested for robbery