शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

‘एटीएम’वर गर्दी वाढली

By admin | Updated: October 14, 2014 23:22 IST

दिवाळीचा परिणाम : ग्राहकांकडून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

रमेश पाटील - कसबा बावडा ...दिवाळी सणामुळे ‘एटीएम’मधून पैसे काढण्याचे प्रमाण ग्राहकांकडून तिप्पट-चौपटीने वाढले आहे. त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या ‘एटीएम’ मशीनमध्ये रोख रकमेचा भरणा दिवसांतून दोनदा, तर काही ठिकाणी दिवसात एकदा ‘कॅश एजन्सी’ला करावा लागत आहे.‘एटीएम’ मशीनमध्ये कॅश स्टोरेजची क्षमता १५ लाख ते २५ लाख इतकी आहे. जुन्या ‘एटीएम‘’मध्ये १५ लाखच भरणा होतो. नवीन बसवण्यात आलेल्या ‘एटीएम’ची क्षमता २५ लाखांपर्यंतची आहे. ग्राहकांची गैरसोय होऊ नये व वारंवार ‘एटीएम’मध्ये कॅश भरणा करावा लागू नये, यासाठी शक्यतो ५०० व १००० रुपयांच्या नोटांचाच जास्त भरणा केला जातो.सध्या ‘एटीएम’मधून एका दिवशी २५ हजार इतकी रक्कम काढण्याची मुभा आहे. त्यामध्ये एकावेळी १५ हजार व नंतर १० हजार अशी २५ हजार रक्कम काढता येते. काही खासगी बॅँका एकाच वेळी ‘एटीएम’मधून ५० हजार रुपये काढण्याची ‘एटीएम’ मशीन बसवण्याच्या विचारात आहेत. सध्या दिवाळीमुळे ‘एटीएम’ मधून पैसे काढण्याचे प्रमाण तिप्पट-चौपट वाढल्यामुळे ‘एटीएम’मध्ये कॅश भरणा करणाऱ्या कॅन एजन्सीला अधिक सतर्क राहावे लागत आहे. दसरा सणावेळी सलग सुट्या येऊनही कॅश एजन्सीला कोणत्याही ‘एटीएम’ध्ये कॅशचा तुटवडा पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.‘एटीएम’मध्ये १००, ५००, १००० च्या नोटांचा भरणा करता येतो. पैकी बहुतेक ‘एटीएम’मध्ये १०० व ५०० च्या नोटांचाच भरणा केला जात असे; परंतु आता कॅश एजन्सीने एटीएममध्ये १ हजाराच्या नोटांचा भरणाही वाढवण्यास सुरुवात केली आहे.जिल्ह्यात ४०० एटीएमजिल्ह्यात ४०० हून अधिक ‘एटीएम’ सेंटर आहेत. पैकी कोल्हापूर शहरात ७५ ‘एटीएम’ची संख्या आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी, आदी परिसरात ‘एटीएम’ची संख्या जास्त आहे.बँकांत गर्दी कमीबॅँकांत दैनंदिन इतर व्यवहार करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी गर्दी होत नाही. पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’चाच वापर ग्राहकांकडून जास्त होत आहे. - एम. जी. कुलकर्णीअग्रणी जिल्हा व्यवस्थापक, बॅँक आॅफ इंडिया.बँकांत गर्दी कमीबॅँकांत दैनंदिन इतर व्यवहार करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र, पैसे काढण्यासाठी गर्दी होत नाही. पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’चाच वापर ग्राहकांकडून जास्त होत आहे. - एम. जी. कुलकर्णीअग्रणी जिल्हा व्यवस्थापक, बॅँक आॅफ इंडिया.