शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी एवढाही दर नाही

By admin | Updated: January 11, 2015 00:46 IST

अजित पवार यांचा शेट्टींना टोला : शेतकरी नेत्यांचे धोरण बोटचेपेपणाचे

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नसताना राज्य व केंद्र सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे होता; परंतू सरकारने काहीच केलेले नाही. आम्ही सत्तेत होतो त्यावेळी आक्रमक असणाऱ्या शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी यावेळी बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारले आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.
भाजपच्या नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आकर्षक आश्वासने देऊन सत्ता मिळविली आणि आता सत्तेत आल्यावर त्यांनी आश्वासनांना बगल देऊन सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, असा घणाघातही पवार यांनी भाजपवर केला.
ते म्हणाले की, भाजप नेत्यांनी काळा पैसा भारतात आणतो म्हणून सांगितले, पण तो आणणे काही त्यांना जमले नाही. शेतकरी अवकाळी पावसाने घाईला आला आहे; परंतु त्यांना कसलीही मदत केली नाही. उसाला एफआरपी एवढा दरही मिळत नाही .एलबीटी विनाअट रद्द करतो म्हणून व्यापाऱ्यांना आश्वासन दिले, पण आता केंद्र सरकारचा जीएसटी येऊ दे, मग आम्ही एलबीटी रद्द करतो, असे सांगायला लागले आहेत. सत्तेत आल्यावर एक महिन्यात टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले; परंतु टोल रद्द करणे सोडाच त्यांच्याच काळात आता नव्याने पालघरला टोलनाके सुरू केले.