शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मग पोहायला जायचं कुठं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे हे जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी अद्यापही खुली झालेले नाहीत. त्यामुळे मुलांना धोकादायक पोहण्याच्या ठिकाणापासून रोखायचे कसे आणि ...

कोल्हापूर : कोरोनामुळे हे जलतरण तलाव सर्वसामान्यांसाठी अद्यापही खुली झालेले नाहीत. त्यामुळे मुलांना धोकादायक पोहण्याच्या ठिकाणापासून रोखायचे कसे आणि मुलांनी सुरक्षित पोहायला जायचे कुठे, असा सवाल पालकांच्या मनात उठला आहे.

उन्हाळा सुरू झाल्यानंतर शहरातील मुले जलतरण तलावावर, तर ग्रामीण भागातील मुले नदी, विहिरी, तलावावर पोहण्यास जातात. ही नियमित बाब होऊन बसली आहे. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे शहरातील ८ जलतरण तलाव २५ मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद होते. त्यानंतर शासनाने केवळ जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जलतरणपटूंना पोहण्याचा सराव करण्याकरिता परवानगी दिली. त्यामुळे सर्वसामान्य हौशी मुले, मुली पोहण्यापासून अजूनही वंचित राहिली आहेत. पोहण्याची ही हौस भागविण्यासाठी शाळकरी मुले धोका पत्करून विहिरी, नदी, नाले, आदी ठिकाणी जात आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शुक्रवारी दिवसभरात तीन शाळकरी व एक तरुणाचा बुडून मृत्यू झाला. त्यात कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे शहरातील जलतरण तलावही बंद करण्याचा विचार जिल्हा प्रशासन करीत आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर शहरातील आठ पैकी पाच जलतरण तलाव केवळ जलतरणपटूंच्या सरावाकरिता खुले आहेत. अन्य सर्वसामान्य मुलांकरिता ते बंद आहेत, तर तीन तलाव अद्यापही बंद अवस्थेत आहेत.

शहरातील जलतरण तलावांची स्थिती अशी,

शहरात शिवाजी स्टेडियम, पीजीटी जलतरण तलाव, रेसिडेन्सी जलतरण तलाव, राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील जलतरण तलाव, शांतिनिकेतन जलतरण तलाव हे तलाव केवळ जलतरणपटूंच्या तयारीकरिता सुरू आहेत. येथे सर्व प्रकारची एसओपी पाळली जाते, तर महापालिकेचा रमणमळा जलतरण तलाव नूतनीकरणानंतर कोरोनाचा कहर वाढू लागल्यामुळे आठ दिवस बंद करण्यात आला आहे. अंबाई टँक, शाहू जलतरण तलाव बंद आहेत.

ही काळजी घ्या

-पाण्याचा अंदाज, तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक.

-अतिउत्साह, स्पर्धा टाळा

- सुरक्षेची साधने वापरावीत. गाळ असेल तर त्या ठिकाणी पोहण्यास जाऊ नये.

- पालकांनीही मुलांसोबत पोहण्यासाठी जाणे अधिक सुरक्षित

- माहिती नसलेल्या विहिरी, तलाव, नदी, नाले, आदी ठिकाणी पोहण्यास जाऊ नये.

कोट

सद्य:स्थितीत केवळ जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जलतरणपटूंकरिता मोजकेच तलाव सुरू आहेत. तेथे कोरोनासहित सुरक्षेची सर्व मानके पाळली जातात.

अजय पाठक, जलतरण पंच, सचिव, मॉडर्न पेंट्याथॉलॉन असोसिएशन ऑफ कोल्हापूर