शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:43 IST

कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी, पोलिस प्रशासन अलर्ट 

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे तगडे नियोजन केले आहे. दोन्ही शहरांत दीड हजार पोलिस, १२१० होमगार्ड यासह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. उपद्रवी केंद्रांची निश्चिती केली असून, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच मतदान शांततेत होण्यासाठी सराईतांवर नजर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.

निवडणुकीसाठी पोलिस खात्याची तयारी

महापालिका निवडणुकांसाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून तयारीला सुरुवात केली होती. दोन आणि त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना नोटिसा देणे, गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना हद्दपार करणे, गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, उपद्रवी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यासह मतदान आणि मतमोजणीसाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

१०० अधिकारी, १४०० पोलिस कर्मचारी

कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही शहरातील बंदोबस्तासाठी सुमारे १०० पोलिस अधिकारी आणि १४०० अंमलदार तैनात केले जाणार आहेत. याशिवाय १२१० होमगार्ड, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन सशस्त्र तुकड्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत.

कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी

शहरात ४४ ठिकाणी १८४ मतदान केंद्रे उपद्रवी आहेत. यात सदर बाजार, विक्रमनगर, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत यासह पेठांमधील काही भागाचा समावेश आहे. चुरशीच्या लढतींमुळे संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले आहे. या केंद्रांवर पोलिस आणि होमगार्डसह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.

२०६ सराईतांना पाठविले जिल्ह्याबाहेर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील २०६ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले. यात कोल्हापुरातील १२८, तर इचलकरंजीतील ७८ सराईतांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे अडीचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.

सहा हजार शस्त्रे पोलिसांत जमा

जिल्ह्यात सुमारे साडेसात हजार शस्त्रे आहेत. सुरक्षा रक्षक आणि खेळाडूंचा अपवाद वगळता साडेसहा हजार शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्ये जमा झाली आहेत. जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत ही शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्येच राहणार आहेत.

शहरातील प्रतिबंधात्मक कारवाया

  • शाहूपुरी : ५१
  • राजारामपुरी : ३७
  • लक्ष्मीपुरी : ३०
  • जुन राजवाडा : ३०


असा आहे बंदोबस्त

कोल्हापूर

  • अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
  • पोलिस उपअधीक्षक : ०६
  • पोलिस निरीक्षक : ११
  • सहायक/उपनिरीक्षक : ४२
  • श्रेणी उपनिरीक्षक : १८
  • पुरुष अंमलदार : ६२४
  • महिला अंमलदार : ९३
  • होमगार्ड : ७९०
  • एसआरपीएफ : दोन तुकड्या
  • सीआरपीएफ : दोन तुकड्या


इचलकरंजी

  • अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
  • पोलिस उपअधीक्षक : ०३
  • पोलिस निरीक्षक : ०७
  • सहायक/उपनिरीक्षक : २२
  • श्रेणी उपनिरीक्षक : ०८
  • पुरुष अंमलदार : २६८
  • महिला अंमलदार : ३०
  • होमगार्ड : ४२०
  • एसआरपीएफ : एक तुकडी
  • सीआरपीएफ : एक तुकडी
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections 2026: Police to Prevent Rigging, Deploy Forces

Web Summary : Ahead of Kolhapur's municipal elections, police are deploying 1,500 officers, home guards, and rapid action forces to prevent disruptions. 206 criminals were expelled and 6,500 weapons were seized to ensure peaceful voting.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६PoliceपोलिसVotingमतदान