शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो, चिंता सोडा.. 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग' निवडा; कोल्हापूर मंडळाने उभारलेले अनोखे मॉडेल नेमकं कसे.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:54 IST

असे केले आहे कामाचे नियोजन

कोल्हापूर : दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा म्हंटले की जितकी चिंता विद्यार्थी-पालकांना असते त्याहून जास्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व कर्मचारी ताण-तणावाखाली असतात. परीक्षा घेण्यापासून ते हॉलतिकीट, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अन् निकाल लावेपर्यंतचा ताण शिक्षकांना येतोच. मात्र, कोल्हापूर विभागीय मंडळाने याच दहावी-बारावी परीक्षेच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाची सुसूत्रता आखत 'बोर्ड परीक्षेचा राजमार्ग'' हे नवे मॉडेल पुस्तिकेच्या माध्यमातून उभारले आहे.कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या या मॉडेलची सध्या राज्यभर चर्चा आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वर्षभराच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे महिनानिहाय, सूत्रबद्ध नियोजन देणारे मॉडेल या पुस्तिकेत मांडले आहे.असे केले आहे कामाचे नियोजनकामाचे ‘प्रथम सत्र’ (दिवाळीपूर्वी) आणि ‘द्वितीय सत्र’ (दिवाळीनंतर) असे स्पष्ट विभाजन केले आहे. प्रथम सत्रात कामे प्रयत्नपूर्वक पूर्ण करणे अपेक्षित आहे, तर द्वितीय सत्रात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा आग्रह आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, सप्टेंबरमध्ये आवेदनपत्रे भरण्यापूर्वी ऑनलाइन टेम्प्लेटचा सराव करण्याची सूचना, तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये प्रि-लिस्ट तपासणी व दुरुस्तीवर भर देणे, यातून कामात अचूकता येणार आहे.शाळा प्रोफाइल, सांकेतांक नूतनीकरण आणि शिक्षक पॅनेल सादर करणे ही कामे वेळेत पूर्ण करण्याची सक्ती आहे. जानेवारीमध्ये अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षांचे गुण ऑनलाइन भरणे या प्रक्रिया पूर्ण केल्याने ऐनवेळी बोर्डावर पडणारा ताण कमी होतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उजळणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाचा ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ हा उपक्रम कठोर परिश्रम, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांप्रति असलेली बांधिलकी यातून शिक्षणाचा मार्ग केवळ 'राजमार्ग' नाही, तर 'यशाकडे नेणारा ठरणार आहे. -राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळ.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's 'Board Exam Highway': A stress-free guide for teachers.

Web Summary : Kolhapur board introduces 'Board Exam Highway,' a guide for teachers. It streamlines administrative and academic tasks, offering a month-by-month plan. The model emphasizes timely completion of tasks, reducing stress and ensuring students have ample revision time. It divides work into pre- and post-Diwali sessions.