शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अनाथांची संख्या शोधणे हेच समितीसमोरील पहिले दिव्य, राज्य शासनाने नेमली संशोधन समिती 

By विश्वास पाटील | Updated: January 1, 2024 15:34 IST

सहा महिन्यांत अहवाल देणे बंधनकारक

राज्य शासनाने अठरा वर्षांवरील अनाथांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी नुकतीच संशोधन समिती स्थापन केली आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्य शासनाने राज्यातील अठरा वर्षांवरील अनाथांच्या समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी संशोधन समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, तूर्त समस्या राहू देत दूरच राज्यात संस्थेतून बाहेर पडणारी अठरा वर्षांवरील मुलांची नेमकी संख्या किती व ते सध्या काय करतात याचाच शोध घेणे हे समितीसमोरील पहिले दिव्य असेल अशी स्थिती आहे.विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर यांनी २७ जुलै २०२३ ला झालेल्या अल्पकालीन चर्चा उपस्थित करून या मुलांसाठी संशोधन समिती स्थापन करण्याचा आग्रह धरला होता. त्याची दखल घेऊन महिला व बालविकास विभागाने त्यासंबंधीचा आदेश ११ डिसेंबरला काढला. महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील १३ जणांची तज्ज्ञ समिती नियुक्त केली. महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त समितीचे सदस्य सचिव आहेत. समितीने सहा महिन्यांत अहवाल दिल्यावर ती आपोआप बरखास्त होईल. राज्यभरात या विभागाच्या सुमारे ७०० संस्था आहेत. त्यात सध्या २२ हजार मुले राहतात. ती सगळीच अनाथ नाहीत. त्यातील काही एकल पालक, काही काळजी व संरक्षणाची गरज निर्माण झालेले आहेत. आतापर्यंत राज्य शासनाने अठरा वर्षांखालील मुलांच्याच संगोपनाचा व भविष्याचा विचार केला त्यामुळे त्यानंतर संस्थेतून बाहेर पडणारी मुले नक्की काय करतात, त्यांचे काय होते..? त्यांना कोणत्या आधाराची गरज आहे. याचा विचारच आतापर्यंतच्या सहा दशकांत कधी झालेला नाही. अठरा वर्षे झाली म्हणजे ती सज्ञान झाली आता त्यांनी त्यांच्या आयुष्याचे काय असेल ते स्वत: बघावे असाच दृष्टिकोन शासनाचा राहिला आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांचे भविष्य उज्ज्वल घडविण्यासाठी शासनाचीही काही जबाबदारी असते व आहे याचाच विसर आतापर्यंत पडला आहे.

पूर्वी संस्थांतील मुलांना आयटीआयपर्यंतच्याच तांत्रिक शिक्षणाची सोय होती. आता या मुलांच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ती मेडिकल, इंजिनिअरिंगपासून पॅरा मेडिकलमध्येही शिकत आहेत. समाजातील अन्य मुलांप्रमाणे त्यांना शासनाने उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. त्यांची अठरानंतरच्या पुढील सहा वर्षांची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. - डॉ. सुनीलकुमार लवटे, अनाथ, निराधार मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर