शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal elections 2026: मतविभागणीवरच प्रमुख उमेदवारांचा होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:48 IST

दोन जागांकडे शहराचे लक्ष

अतुल आंबी

इचलकरंजी : प्रभाग क्रमांक १३ व १४ या दोन प्रभागांत तीन माजी नगरसेवक, दोन माजी नगरसेवकांचे नातेवाइक, १३ नवखे आणि ५ अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही प्रभागांत भाजप, शिव-शाहू यांची टक्कर असून अपक्षांसह उद्धव सेना आणि आप प्रत्येकी एक जागांवर मतांची बेरीज-वजाबाकी करत आहे. त्याचा निकालावर कसा परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.

प्रभाग १३ ‘अ’ मध्ये रुपाली सातपुते विरूद्ध मुस्कान खानापुरे अशी पक्षीय लढत असली तरी त्यामध्ये माजी नगरसेविका सायली लायकर या अपक्ष टक्कर देत आहेत. ‘ब’ मध्ये शशिकला कवडे (भाजप), निता पाटील (उद्धव सेना) आणि अश्विनी गोंदकर (शिव-शाहू) अशी तिरंगी लढत आहे. ‘क’ मध्ये चंद्रकांत शेळके विरूद्ध नागेश शेजाळे यांच्यात दुरंगी, तर ‘ड’ मध्ये रणजित लायकर विरूद्ध अमरजित जाधव यांच्यात चुरस आहे.

प्रभाग १४ ‘अ’ मध्ये सपना भिसे विरूद्ध कल्पना धुमाळ, ‘ब’ मध्ये भाजपचे पदाधिकारी शहाजी भोसले यांची पत्नी मेघा भोसले विरूद्ध अ‍ॅड. रागिनी मोरबाळे अशी चुरस आहे. ‘क’ मध्ये अभिषेक वाळवेकर विरूद्ध नितीन भुते या दोघांत काटे की टक्कर सुरू आहे. ‘ड’ मध्ये माजी नगरसेवक दीपक सुर्वे यांचा पुतण्या ओमकार सुर्वे (भाजप) विरूद्ध शिव-शाहूकडून अभिषेक सारडा आणि त्यामध्ये आपचे प्रकाश सुतार तिरंगी लढत आहे.

दोन जागांकडे शहराचे लक्ष

प्रभाग १३ ‘क’ आणि १४ ‘क’ मध्ये एकास एक लढत आहे. दोन्ही जागांवरची चुरस आणि माघारीसाठीच्या घडामोडी पाहता या दोन्हीही जागांच्या निकालावर शहरवासीयांत उत्सुकता आहे.

मैत्रीपूर्ण लढत नाही

प्रभाग १३ आणि १४ या दोन्ही प्रभागांत महायुतीची मैत्रीपूर्ण लढत नाही. परंतु एका जागेवर उद्धव सेना आणि एका जागेवर आप हे दोन पक्षही मैदानात उतरले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Elections 2026: Vote division to decide key candidates' fate.

Web Summary : Ichalkaranji's wards 13 and 14 witness fierce battles between BJP, Shiv-Shahu alliance, and independents. Key contests involve former corporators and their relatives. The division of votes will be crucial in determining the winners, with close fights anticipated in several wards.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती