शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्रकाश आवाडेंच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजीत एकास एक लढत?, कार्यकर्त्यांत मनोमिलनाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 13:35 IST

हाळवणकर यांच्या मेळाव्याकडे लक्ष

अतुल आंबी

इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ताराराणी पक्षात उत्साह, तर भाजपमध्ये अस्वस्थता असे वातावरण असून दोन्हीकडील कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान नेत्यांसमोर आहे. दरम्यान, आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने इचलकरंजी मतदारसंघात एकास एक लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने शहरातील महायुतीसह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आवाडे यांच्या नेहमी विरोधात असणारे अनेकजण महायुतीमध्ये कार्यरत होते. आवाडे यांनी राजकीय खेळी करत तेथे उडी घेतल्याने त्यांची गोची झाली असून, त्यांची पुढील भूमिका कशी राहणार, याकडेही लक्ष लागले आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्येही खलबत्ते सुरू असून, आवाडे यांना टक्कर देण्यासाठी एकत्रित येऊन एकास एक उमेदवारीची समीकरणे जुळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात महायुतीमधील परंपरागत कट्टर आवाडे विरोधक सोबत येऊन अथवा अंतर्गत आपणास मदत करतील का, यासाठीही चाचपणी सुरू आहे.

शहरात आवाडे यांना विरोध करण्यासाठी अनेकवेळा विरोधकांनी एकत्र येत एकास एक उमेदवार देऊन आवाडे यांना आव्हान उभे केले आहे. अशा एकास एक लढतीत आवाडे यांना पराभव पत्करावा लागला आहे. हा इतिहास पाहता यंदाही तसा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. त्यात आमदार आवाडे यांनी स्वत: बाजूला राहत पुत्र राहुल यांना उमेदवारी घोषित केल्याने विरोधकांनी तीन पिढ्या एका घरात आमदारकी द्यायची काय, असे म्हणत रान उठविण्यास सुरूवात केली आहे.

बेरजेची राजकीय खेळी

आवाडे यांनी बेरजेची राजकीय खेळी करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या गटाची स्वत:ची मते त्यामध्ये भाजप म्हणून मिळणारी पक्षाची मते तसेच मोदीप्रेमी व हिंदुत्ववादी मते आवाडे यांना मिळतील, असे त्यांचे गणित आहे.

हाळवणकर यांच्या मेळाव्याकडे लक्ष

सध्या पक्षादेश असल्याने सुरेश हाळवणकर यांना वेगळी भूमिका घेणे अडचणीचे आहे. मात्र, त्यांच्यासोबत कोणतीही अपेक्षा न बाळगता निष्ठावंत म्हणून राहिलेल्या कार्यकर्त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पितृपक्षानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन हाळवणकर त्यांची भावना जाणून घेणार आहेत. त्यामध्ये होणाऱ्या निर्णयाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कार्यकर्त्यांची मानसिकता

वर्षानुवर्षे आवाडे विरोधक म्हणून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांची आवाडे यांचा प्रचार करण्याची मानसिकता दिसत नाही. मुळात हाळवणकर यांनीही पत्रकारांशी बोलताना आवडे यांना वैचारिक विरोध राहणारच, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाचे पालन म्हणून ते कितपत सक्रिय राहतात आणि आवाडे यांच्याशी कसे जुळवून घेतात, त्यावरही कार्यकर्त्यांचा कल अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर