शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

महिला कर्मचाऱ्यांना गैरशब्द वापरल्याने तणाव

By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST

इचलकरंजी पालिका : मुख्याधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वादावर पडदा

इचलकरंजी : शहरातील फासेपारधी समाजाच्या शिष्टमंडळाकडून नगरपालिकेकडील नगररचना विभागात असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना गैरशब्द वापरल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे नगरपालिकेमध्ये सायंकाळी उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. मुख्याधिकारी सुनील पवार यांनी या प्रकरणी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.शहरातील वॉर्ड नं. २० व २१ मध्ये फासेपारधी समाजाची कुटुंबे राहतात. त्यांना शासकीय योजनेतून घरकुले बांधून देण्याची मागणी गेली चार-पाच वर्षे होत आहे. घरकुले बांधण्यासाठी नगरपालिकेकडे रिकामी जागा उपलब्ध नसल्याने अखेर त्या कुटुंबांना ते सध्या राहत असलेल्या ठिकाणीच राजीव गांधी आवास योजनेतून घरकुले बांधून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा आशयाचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला.या पार्श्वभूमीवर फासेपारधी समाजाने नगरपालिकेकडे वॉर्ड नं. २० व २१ मध्ये पालिकेची जागा उपलब्ध नसल्याचे लेखी मागितले. त्याप्रमाणे पत्र घेऊन जाण्यासाठी फासेपारधी समाजाचे शिष्टमंडळ आज, बुधवारी सायंकाळी नगरपालिकेत आले. ते पत्र नील मुद्रक सुमन डाफळे-चौगुले यांच्याकडून घेत असताना पत्रातील मजकुराबाबत वाद निर्माण झाला. त्याचवेळी कुणीतरी यामध्ये गैरव्यवहार असल्याचे म्हटल्याने संतापलेल्या डाफळे-चौगुले यांनी त्यास आक्षेप घेतला. यावरून वाद आणखी वाढला. अखेर हा वाद मुख्याधिकारी पवार यांच्याकडे गेला. पवार यांनी दोन्ही बाजू समजावून घेऊन त्यावर पडदा पाडला. शिष्टमंडळात मोहन काळे, लिंगाप्पा चव्हाण, शंकर चव्हाण, मंगल काळे, कला चव्हाण, आशा काळे, मालू चव्हाण, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)