नीलेवाडी रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:25 IST2021-02-11T04:25:30+5:302021-02-11T04:25:30+5:30

नवे पारगाव : नीलेवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नीलेवाडीतील रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी देत असल्याचे आमदार ...

Ten lakh fund for Nilewadi road | नीलेवाडी रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी

नीलेवाडी रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी

नवे पारगाव : नीलेवाडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. नीलेवाडीतील रस्त्यासाठी दहा लाखांचा निधी देत असल्याचे आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितले. नीलेवाडी (ता. हातकणंगले) येथे विकासनिधीतील कामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

घाटगे पाणंद रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नीलेवाडी - चिकुर्डे दरम्यान मोठा पूल बांधणार असून, नीलेवाडीतून संजय गांधी निराधार योजनेचे जास्तीत जास्त अर्ज भरून घेत निराधार जनतेचे श्रावण बाळ होणार असल्याचे आमदार आवळे यांनी सांगितले. यावेळी सुभाष भापकर, शहाजी बोरगे, माणिक घाटगे, प्रभाकर घाटगे, शामराव उरूनकर, संतोष जाधव, प्रकाश भोसले, शिवाजी खोत, बाळासो सूर्यवंशी, शंकर घाटगे, अशोक घाटगे, बबन टोपुगडे, शिवाजी माने उपस्थित होते.

फोटो ओळी : नीलेवाडी येथील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुभाष भापकर, शहाजी बोरगे, माणिक घाटगे, प्रभाकर घाटगे आदी उपस्थित होते.

Web Title: Ten lakh fund for Nilewadi road