शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, काय असेल कोल्हापूरचे भवितव्य

By admin | Updated: August 24, 2014 00:40 IST

शासन, प्रशासन, शिक्षणक्षेत्राला तरुणाईचा प्रश्न : ‘सतेज युथ फेस्ट २०१४’चे शानदान उद्घाटन

कोल्हापूर : शिक्षण रोजगाराभिमुख कसे कराल, टोलचा प्रश्न कधी सुटणार, महालक्ष्मी मंदिर परिसरातील दुर्गंधी-अस्वच्छतेमुळे पर्यटकांसमोर कोल्हापूरची नाचक्की होत नाही का, अभ्यासू मुलांवर अन्याय करीत खेळाडूंना थेट प्रशासनात नोकरी दिली जाते, तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाते का, मुलींच्या छेडछाडीला लगाम कसा घालाल... एकीकडे सर्वधर्म समानता सांगितली जाते, तर दुसरीकडे कमी टक्केवारी असलेल्या मुलांना आरक्षणाचा लाभ का दिला जातो... अशा विविध प्रश्नांद्वारे तरुणाईने शासन, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रासमोर आपल्या मनातील कल्लोळ व्यक्त केला. त्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देत २०२० साली कोल्हापूर सर्वांगांनी विकसित झालेले शहर असेल, अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. ‘मार्गदर्शनपर भाषण’ या उद्घाटनाच्या पद्धतीला फाटा देत ‘सतेज युथ फेस्ट’ या महोत्सवाचे उद्घाटन ‘कोल्हापूर २०२०’ या संवादात्मक कार्यक्रमाने झाले. यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सुभेदार यांनी तरुणाईने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोल्हापूरची विमानसेवा कधी सुरू होणार? या प्रश्नावर सतेज पाटील यांनी एअरलाईन्स कंपन्यांमुळे टेक आॅफ झालेला नाही; मात्र लवकरच ही सेवा सुरू होईल, असे सांगितले. धार्मिक आरक्षणामुळे कमी टक्केवारी असलेल्या मुलांना सोयी-सवलती आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो आणि हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, यावर पाटील यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण जाहीर व्हावे, असा मतप्रवाह असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दोन महिन्यांत प्रत्येक महाविद्यालयात तक्रार पेटी ठेवली जाईल व महाविद्यालयाच्या समितीवर एका महिला कॉन्स्टेबलची नेमणूक केली जाईल, असे सांगितले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत; यावर सर्वच मान्यवरांनी ग्रामीण भागातील मुले शहरी मुलांच्या तुलनेत अधिक हुशार असतात. शिवाय संघर्षाची तयारी असल्याने गेल्या काही वर्षांत या मुलांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवले असून, आम्हीही ग्रामीण भागातूनच आलो असल्याचे सांगितले. राज्य शासनाची भूमिका टोल रद्दचीच...४कोल्हापूरच्या टोल प्रश्नावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, ज्यावेळी हा प्रकल्प कोल्हापुरात आला तेव्हा त्याला विरोध नव्हता. पुढे प्रकल्पाविषयी शंका निर्माण झाल्यानंतर रस्त्यांचे मूल्यांकन सुरू झाले. शहरात रस्ते झालेत म्हणजे प्रकल्पाचे पैसे कुणीतरी भागवावेच लागणार. राज्य शासनाची भूमिका टोल रद्दचीच आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय होईल. ४पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आंतरराष्ट्रीय खेळांत पदके मिळविलेल्या खेळाडूंना थेट प्रशासनात उच्च पद दिले जाते. त्यासाठी ती व्यक्ती खरेच पात्र आहे का, याचा विचार केला जावा. सुहास खामकरने जे काही केले, त्या अनुभवातून पदाचा वापर कशासाठी केला जातो, याचा विचारही शासनाने करावा आणि त्याचे निकष बदलावेत, अशी मागणी एका विद्यार्थिनीने केली.