शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआर, आयजीएममधील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीसाठी तंत्रज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:26 IST

कोल्हापूर : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीबाबत ...

कोल्हापूर : नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्यांच्या देखभालीबाबत दक्ष राहण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही याबाबत स्वतंत्र पत्रे काढली आहेत.

येथील सीपीआरमध्ये २० हजार लिटर क्षमतेची लिक्विड ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली आहे. ३० फूट उंच आणि दोन मीटर व्यासाची ही टाकी गतवर्षी कोरोनाच्या उद्रेकानंतर ऑगस्टमध्ये बसविण्यात आली. यासोबतच ४०० क्यूबिक मीटर प्रतितास क्षमतेचा वेपोरायझरही बसविण्यात आला आहे. या टाकीमधून सीपीआरमधील १७ ठिकाणच्या ऑक्‍सिजन बँकमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तेथून पाईपलाईनद्वारे रुग्णांच्या खाटापर्यंत ऑक्सिजन पुरविण्यात येतो. गेल्या वर्षभरापासून कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी अडचण निर्माण झाली नाही. अगदीच येथील ऑक्सिजन पुरवठा करण्यामध्ये अडचण निर्माण झाली, तर पर्यायी जम्बो सिलिंडर्सचीही सोय करण्यात आली आहे.

या टाक्यांच्या देखभालीसाठीही तंत्रज्ञांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञ रोज या ठिकाणी पाहणी करतात. जेव्हा टाकीमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर येतो, तेव्हासुद्धा नीट काळजी घेतली जाते. यावेळी कुठे गळती होते का याची पाहणी केली जाते.

चौकट -

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयातसुद्धा सहा हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्यात आली असून, याचा २०० हून अधिक रुग्णांना फायदा होतो. १७ फूट उंचीची आणि दोन मीटर व्यासाची ही टाकी असून, या ठिकाणीही तंत्रज्ञ नेमण्यात आला आहे.

चौकट -

अधिष्ठातांकडून पाहणी

राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी गुरुवारी दुपारी ऑक्सिजन टाकीची पाहणी करून संबंधितांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. याचवेळी ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर आल्यामुळे या प्रक्रियेचीही त्यांनी माहिती घेतली. यावेळी डाॅ. उल्हास मिसाळ उपस्थित होते.

२२०१२०२१ कोल सीपीआर ०१

कोल्हापुरातील सीपीआरमधील ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरमधील द्रव ऑक्सिजन भरला जात असताना संबंधितांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

छाया.. समीर देशपांडे