पुस्तकाबाहेर जाऊन शिकविण्याची जबाबदारी शिक्षकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:48+5:302021-01-20T04:25:48+5:30
रोटरीचे नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : नव्या तंत्रयुगात बदलत्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांना उपदेशक म्हणून ...

पुस्तकाबाहेर जाऊन शिकविण्याची जबाबदारी शिक्षकांवर
रोटरीचे नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण
(फोटो)
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : नव्या तंत्रयुगात बदलत्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांना उपदेशक म्हणून काम करावे लागेल. विद्यार्थ्यांचे गुण ओळखून त्यांना घडविण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक या त्रिकोणात समन्वय ठेवावा लागेल. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी पुस्तकाबाहेर जाऊन शिकविण्याची जबाबदारी सध्या शिक्षकांवर आली आहे, असे मत भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लबतर्फे आयोजित शिक्षकांच्या नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी शहर व परिसरातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन अशा २९ गुणवंत शिक्षकांना नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. फोर वे टेस्टचे वाचन सागर पाटील यांनी केले. सहायक प्रांतपाल भाऊ नाईक यांनी नेशन बिल्डर अवॉर्ड प्रक्रियेची माहिती दिली. रोटरीचे अध्यक्ष अभय यळरुटे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास प्रशांत कांबळे, मुकेश जैन, वसंत पाटील, सत्यनारायण धूत, श्रीनिवास दबडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनीष मुनोत यांनी केले. दीपक निंगुडगेकर यांनी आभार मानले.
(फोटो ओळी) १९०१२०२१-आयसीएच-०१
रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवॉर्डचे वितरण कुलगुरु डॉ. माणिक साळुंखे यांनी केले. यावेळी अभय यळरुटे, दीपक निंगुडगेकर, नेमिनाथ कोथळे आदी उपस्थित होते.