शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime News: पासवर्ड बदलला..कर सल्लागाराचा व्यावसायिकास ५८ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 12:11 IST

पोलिसांत गुन्हा दाखल : इतरांची बिले अपलोड केल्याने जीएसटीची नोटीस

कोल्हापूर : येथील दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मचा कर सल्लागार तुषार तातोबा पाटील (वय २९, रा. बामणी, ता. कागल) याने इतरांची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड करून ५८ लाख ८१ हजारांचा गंडा घातला. हा प्रकार एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याबाबत फर्मचे प्रमुख शैलेश सुभाष जाधव (३७, रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांची दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्म आहे. या फर्मकडून नामांकित कंपनीच्या वस्तूंची विक्री केली जाते. एप्रिल २०२३ पासून तुषार पाटील हा फर्मचा कर सल्लागार म्हणून काम करीत होता. त्याने विश्वास संपादन करून जाधव यांच्याकडून फर्मच्या जीएसटी खात्याची माहिती घेतली.

पासवर्ड बदलून त्याला स्वत:चा मेल आयडी जोडला. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या काळात त्याने दोन कोटी १५ लाख चार हजार ७१३ रुपयांची विक्रीची बिले फर्मच्या जीएसटी खात्यावर अपलोड केली. त्यानुसार जीएसटी कार्यालयाकडून जाधव यांना ५८ लाख ८१ हजार ५०३ रुपये जीएसटी भरण्याची नोटीस आली.

मोठ्या रकमेचा जीएसटी भरण्याची नोटीस येताच फर्मचे मालक जाधव यांनी जीएसटी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी कर सल्लागार पाटील याने दत्त समर्थ सर्व्हिसेस फर्मच्या खात्यावर विक्रीची दुसरीच बिले अपलोड केल्याचे लक्षात आले. त्याने ५८ लाख ८१ हजारांचा अपहार केल्याचे स्पष्ट होताच जाधव यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोर अधिक तपास करीत आहेत.

पासवर्ड बदलले

तुषार पाटील हा बी.कॉम. झाला असून, तो कर सल्लागार म्हणून काम करीत होता. सीएंकडून केली जाणारी कामे चोख पद्धतीने करू, अशी ग्वाही त्याने फिर्यादी जाधव यांना दिली होती. मात्र, विश्वासघात करून त्याने फिर्यादींच्या जीएसटी खात्याचे पासवर्ड बदलले. त्याला स्वत:चा मेलआयडी जोडून जाधव यांना अंधारात ठेवले. जीएसटी विभागाची नोटीस आल्यानंतरच अपहाराचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Tax advisor's password trick defrauds businessman of ₹58 lakhs.

Web Summary : Kolhapur businessman defrauded of ₹58 lakhs by tax advisor Tushar Patil. Patil changed GST account password, uploaded false bills, leading to a hefty GST notice.