तारदाळचा तेलताड गोव्यात

By Admin | Updated: December 19, 2014 23:31 IST2014-12-19T21:12:28+5:302014-12-19T23:31:02+5:30

राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने तो पाहण्यास ठिकठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tartal lalatad in Goa | तारदाळचा तेलताड गोव्यात

तारदाळचा तेलताड गोव्यात

खोची : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील तेलताड पिकाचे उत्पादन पामतेल निर्मितीसाठी गोवा येथे पाठविले. मीनाक्षी मदन चौगुले यांच्या शेतात तेलताड लागवड काढणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याने तो पाहण्यास ठिकठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पिकाची लावण तीन वर्षांपूर्वी मीनाक्षी चौगुले व त्यांचे पती मदन चौगुले यांनी केली होती. तीन वर्षे तीन महिन्यांनी या पिकाची काढणी घेण्यात आली. यापुढे ती ३५ वर्षे घेता येणार आहे. या पिकांपासून पामतेलाची निर्मिती होते. एक तासाच्या प्रात्यक्षिकात तीनशे किलो उत्पादन काढण्यात आले. ते उत्पादन गोवा येथे तेल निर्मितीसाठी पाठविले.
मदन चौगुले यांनी स्वागत केले. कृषी अधिकारी व्ही. व्ही. देवकर, तालुका कृषी अधिकारी एन. व्ही. चव्हाण, एस. ए. भोजकर, विस्तार अधिकारी शुभांगी सूर्यवंशी, सर्जेराव शिंदे, आर. ए. पाटील, राहुल देसाई, समीर पै रायकर, जे. एम. नदाफ, महेश देसाई, प्रकाश बोबरे, सरपंच शाराबाई कांबळे, अशोक गायकवाड, पापालाल मुजावर उपस्थित होते. मीनाक्षी चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या तालुक्यांत ६५० हेक्टरमध्ये तेलताड लागवड करण्यात आलेली आहे. तारदाळ येथील या लागवडीची कापणी म्हणजे राज्यातील पहिली कापणी आहे, असे संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Tartal lalatad in Goa