शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मार्चअखेर साठ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य

By admin | Updated: September 4, 2014 00:22 IST

भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था : महिन्याभरात वीस हजारांपर्यंतच्या ठेवींचे वाटप

कोल्हापूर : भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेची थकीत कर्जवसुली मोहीम गतिमान होणार असून, त्या दृष्टीने अवसायक मंडळाने नियोजन केले आहे. मार्च २०१५ अखेर किमान साठ कोटी रुपयांची थकबाकी वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्या दृष्टीने येत्या आठ दिवसांत वसुली मोहीम कार्यान्वित करण्यात येणार आहे. भुदरगड पतसंस्थेचे अवसायक मंडळाचे अध्यक्ष म्हणून डॉ. पी. बी. खंडागळे काम पाहत होते; पण त्यांची बदली झाल्याने कामकाज करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. यासाठी कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांची अवसायक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह अवसायक मंडळाचे सदस्य व जिल्हा विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी गेले चार दिवस संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊन वसुली व ठेवी वाटपाबाबत धोरण निश्चित केले. ‘भुदरगड’साठी राज्य शासनाच्या पॅकेजमधील १५ कोटी ५० लाख रुपये मंजूर झालेले आहेत. यामधून दहा हजार रुपयांपर्यंतच्याा ठेवींचे वाटप गेले दीड वर्ष सुरू आहे; पण त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने दहा ते वीस हजारांपर्यंतच्या ठेवी वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या ठेवीदारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झाले असून, महिन्याभरात दहा ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना पैसे दिले जाणार आहेत. पतसंस्थेची एकूण थकबाकी १६० कोटी असून, ठेवीदारांचे १२४ कोटी रुपये अडकले आहेत. यासाठी वसुली मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. ४२०० थकबाकीदार असून त्यांच्या जंगम जप्तीची कारवाई सुरू झाली आहे. संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांबरोबर एक वसुली अधिकारी असे पथक तयार करण्यात आले आहे. मार्च २०१५ अखेर किमान ६० कोटी रुपये वसूल करून ठेवीदारांचे जास्तीत जास्त पैसे देण्याचा अवसायक मंडळाचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)पतसंस्थेच्या संचालकांवर कलम ८८ अनुसार जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्यावर निश्चित केलेल्या ४८ कोटींपैकी आतापर्यंत दोन कोटींची वसुली झाली असून, त्यांच्या मालमत्तेचा शोध घेऊन पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ‘भुदरगड’ची वसुली मोहीम सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून गतिमान केली आहे. तिचे नियोजन पूर्ण झाले असून, थकबाकीदारांच्या मालमत्ता शोधून कारवाई करण्याचे आदेश वसुली अधिकाऱ्यांना दिले आहेत. मार्चअखेर साठ कोटी रुपये वसूल करून ठेवीदारांना मुक्त करण्याचा प्रयत्न राहणार आहे. - राजेंद्रकुमार दराडे, अध्यक्ष, ‘भुदरगड’ अवसायक मंडळ