शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उपसरपंचाकरवी पाच हजारांची लाच स्वीकारली, शिंगणापूरचा तलाठी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 17:38 IST

दोघांनाही अटक : सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी दहा हजारांची मागणी

कोल्हापूर : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी उपसरपंचाकरवी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंगणापूर सज्जातील तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी अटक केली.

तलाठी इरफान दिलावर सनदी (वय ४१, रा. शिवाजी कॉलनी, लाइन बाजार, कोल्हापूर) व उपसरपंच दीपक सदाशिव कांबळे (वय ४३), असे अटक केलेल्यांची नावे आहेत. कारवाईत तलाठी आणि उपसरपंच जाळ्यात सापडल्याने महसूल आणि ग्रामपंचायत प्रशासनात खळबळ उडाली.

लाचलुचपत प्रतिबंधक प्रशासनाने सांगितले की, शिंगणापूर सज्जात अनेक दिवसांपासून सनदी तलाठी म्हणून काम करीत होता. यातील तक्रारदार हे खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी तलाठी कार्यालयात आले होते. दरम्यानच्या काळात तक्रारदार यांना उपसरपंच कांबळे याने तलाठीकडून नाव लावून घेण्यासाठी सुरुवातील दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाच हजार रुपये द्यावे, असे सांगितले. 

कांबळे यांनी सांगितलेल्या पाच हजार रुपयांच्या लाचेस तलाठी सनदी याने दुजोरा दिला. त्यांनी बेकायदेशीरपणे लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी केली. त्यानंतर पथकाने सापळा रचला. गुरुवारी शिंगणापूर तलाठी कार्यालयात तडजोडीची पाच हजार रुपये सनदी याच्यासाठी उपसरपंच कांबळे याने लाच म्हणून रंगेहाथ मिळाला. करवीर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सात आणि सात अ कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू आहे.

कार्यालयाची झडती...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना सापडल्यानंतर तलाठी कार्यालयाची झडती घेण्यात आली. तलाठी सनदी आणि उपसरपंच कांबळे याची अंग आणि वाहन झडतीही घेण्यात आली. यावेळी लाच रक्कम दीपक कांबळे यांनी तक्रारदार यांना तलाठी कार्यालयाचे बाजूस असलेल्या रूममधील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यास सांगितल्याचे समोर आले. पथकाने ड्रॉवरमधील लाच रक्कम आणि मोबाइल जप्त केले.

सायंकाळी उशिरापर्यंत घरझडती..

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून सायंकाळी उशिरापर्यंत आरोपीच्या शिंगणापूर आणि कोल्हापुरातील घरझडतीची प्रक्रिया सुरू होती.

लाचेची मागणी केल्यास संपर्क साधा...

लाचेची अथवा अपसंपदेबाबत कोल्हापुरातील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयाकडे तक्रार करावी. उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या ९७६४१४०७७७, ९४०४३२१०६४ किंवा कार्यालय ०२३१-२५४०९८९, हेल्पलाईन क्रमांक १०६४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Village official, clerk arrested for accepting bribe for land record.

Web Summary : A village official and clerk in Shingnapur, Kolhapur, were arrested for accepting a ₹5,000 bribe to add a father's name to land records. Anti-Corruption Bureau laid the trap after a complaint. Searches are ongoing.