शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

दक्षता समितीकडील प्रकरणांवर तत्काळ कार्यवाही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडील प्रकरणांवर सर्व संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी, जिल्हा दक्षता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडील प्रकरणांवर सर्व संबंधित यंत्रणांनी तत्काळ कार्यवाही करावी, जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी स्वत: उपस्थित रहावे. प्रतिनिधी पाठवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सहाय्यक संचालक सरकारी अभियोक्ता नसरीन मणेर, जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी.जी. काटकर, पोलीस निरीक्षक बाजीराव कळंत्रे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे आर.जी. माने, अशासकीय सदस्य निरंजन कदम, राजू मालेकर, सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, समाज कल्याण निरीक्षक डी.एस. पाटील, तालुका समन्वयक सचिन कांबळे उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ची प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत म्हणाले, डिसेंबर २०२०अखेर पोलीस तपासावर ३२ प्रकरणे प्रलंबित होती. त्यापैकी १७ प्रकरणांचे दोषारोपपत्रे गेलेली असून, १५ प्रकरणे ही पोलीस तपासावर आहेत. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी दोषारोपपत्रे पाठविताना मुदतीची वाट पाहू नये, त्वरित दोषारोपपत्रे पाठवावीत, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अवगत करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

शासन निर्णयानुसार सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करून त्यांचा अहवाल जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीस सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

---

फोटो नं २७०१२०२१-कोल-दक्षता समिती

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक झाली. यावेळी डॉ. हर्षला वेदक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.