शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

तिची उदंड लेकरं - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:27 IST

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली. -- "वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?" "विचारा ...

'अनुबंध ', पत्रकार नगर, कै. बाळ पळसुले पथ, सांगली.

--

"वहिनी, एक विचारलं तर राग नाही ना येणार?"

"विचारा की हो. रागबिग कशाला येणार? तुम्ही काय वाईट साईट सांगणारेय का?"

"इडलीचं पीठ माझ्याकडून जरा जास्त भिजवलं गेलंय. त्यातलं थोडं नेताय का?"

" अय्ययो, तुम्ही ते मिक्सरमधी वाटतो. आम्ही रगड्यात रुबतो. आम्माला नाही चालत. असं करा, अर्धअधिक फ्रीजमधील ठेवून सोडा की. दोन-तीन दिवसांनी आप्पे नाहीतर डोसे घालून सोडा. चालतंय की"

सुब्बाराव वहिनीनी सुचवलं. निमाताईंनी कपाळाला हात लावला. पीठ संपवण्याची त्यांची आशा संपली होती.

"अहो, फ्रीजमध्ये काय ठेवताय वहिनी, फ्रीज इतका भरलाय, की आणखी काही ठेवलं तर पडेल खाली. बरं त्या पोपटानी भाभीना विचारते. त्या भाभी खिडकीतून ऐकतच होत्या. त्या दार उघडून बाहेर आल्या. ओढणी सावरत म्हणाल्या, "क्या हुवा निमाभाभी? फ्रीज बिघडला क्या? काय ठेवायचं है ?माझ्या फ्रीजमंदीभी जगह नही. नायतर ठेवलं असतं. प्रॉब्लेम तर काय तो सांग". तेवढ्यात त्यांची कामवाली तिथे धडकली. कमरेवर हात ठेवून म्हणाली, "इडलीच्या पिठाचं काय झालंय? फसफसलंय? फोहं घाला जरा भिजवून. नायतर कांदा ठेवा मधी."

"तू आता आम्हाला शिकव. तुमच्यामुळेच होतेय आमची अशी पंचाईत. तुम्हाला मोठे गर्व चढलेत ना. थांब, आता मोदी सायबाना पत्रच लिहिते." निमा वहिनींनी तिला फटकारलं. कामवाली गप्प बसणार होय? ती लागली तडातडा फुटाणे फोडायला. लिवा, लिवा, पत्र कशाला? फोन करा. आमच्यासारख्यांशी बोलतात ते. परवा भिशीवाल्या बायासंगं बोलले म्हनं फोनवरून."

" तू काम कर गं. नीट कर सफाई. तर निमाभाभी, तुझा प्रॉब्लेम कळला. दोन-तीन वाट्या पीठ माझ्याकडे दे."

"बापरे . तुम्ही इडली करणार? साहेबांना आवडतील का?" म्हणत पडत्या फळाची आज्ञा म्हणून का होईना निमा वहिनींनी पीठ आणलं.

"नही, मी इडली नाही बनवणार. मी त्यात डाळीचं पीठ, बटाटा, कांदा घालून पकोडे डीप फ्राय करणार. न्यू रेसिपी." "वावा, बरं झालं बाई." म्हणत निमा वहिनींनी सुस्कारा सोडला नि त्या आत गेल्या.

कॉलनीचं नाव 'शिल्प चिंतामणी.' इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफची म्हणून शिल्प नि सांगलीचं ग्रामदैवत गणपती म्हणून चिंतामणी. कॉलनी तशी मोठीच. प्राचार्य, उपप्राचार्य, रजिस्ट्रार, एच. ओ. डी. वगैरेंचे दहाबारा बंगले नि बाकीची अपार्टमेंट्स. भारतभरचे निरनिराळ्या विषयांचे, डबल, तिबल पदव्यांवाले इंजिनिअर इथे लेक्चरर, प्रोफेसर म्हणून नोकरीला लागलेले. त्यामुळे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सर्व प्रांतीय मंडळी एकत्र राहत होती. निरनिराळ्या जातिधर्माची, कोणी रिटायर्ड, कोणी अजून नोकरीत असलेले, व्हरायटी होती तरी छान एकोप्याने राहत होती मंडळी. बरीच वर्षं महाराष्ट्रात राहिल्यामुळे सगळ्यांना मराठी चांगलं समजत होतं. राज ठाकरेंची दहशत होतीच. बोलताना मात्र त्यांच्या भाषेचा टोन यायचा. काही शब्द त्यांच्या भाषेतले यायचे. उत्तरेतला करवा चौक, दक्षिणेतला पोंगल, गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गा पूजा आणि महाराष्ट्रातला गणपती. सगळ्या सणात सगळी भाग घ्यायची. आठ-दहा बायका नोकरीवाल्या होत्या. बाकीच्या हाऊस वाईफ. बाईच्या मदतीने घरातलं काम, मुलांचा अभ्यास घेणं, बाहेर जाणाऱ्यांना डबे करून देणं, वाढदिवस साजरे करणं, हळदी कुंकवं, लग्न, डोहाळे जेवणं, बारशी असे समारंभ, त्यासाठी एकमेकांकडे जाणं सगळी दैनंदिनी आखीव रेखीव.

" हॅलो, दाते काकूच बोलताय ना? जेवणं झाली का? संध्याकाळी जरा मंडईत फेरी मारायची का?”

"भाजी घ्यायचीय? येते कंपनी म्हणून. पण मला तर काहीच घ्यायचं नाहीये. पाव किलोची भाजीसुद्धा संपत नाही. कशी संपणार चार माणसात? पूर्वी कसं थोडी उरली तर यमुनाबाई नेत होत्या.

म्हणायच्या, ठेवा वयनी. लक्ष्मीला नाकारायचं न्हाई. पण आता अजिबात नेत नाहीत."

"तर काय. आमची शांता, चार मुलं आहेत बरका तिला. एखादी भाकरी उरली ती ने म्हटलं तर नको म्हणते. बरं उरलेलं घालायचं तरी कोणाला? मुलं लहान. आजी-आजोबा म्हातारे. नवरा घरचा धनी.

शेवटी मलाच शिळवड संपवावी लागते. दिलीप म्हणतो, 'जेवढ्यास तेवढं करावं.' ह्याला काय सांगायला. सासूबाईंना पटत नाही त्याचं जुनं तत्त्व. सगळ्या भांड्यांचा खडखडाट करायचा नाही. मध्यरात्री दमून भागून कोणी आलं तरी त्याला चार घास घालता आले पाहिजेत."

"हल्ली असं कोणी येत नाही म्हणावं त्यांना. लॉजमध्ये उतरतात. अहो वहिनी, मी जेवायच्या आधी प्रत्येकाला विचारते, 'तू किती पोळ्या खाणार'?’ तर सासरे मला कसले रागावले. अगदी माझ्या कोकणस्थी जातीचा उद्धार केला त्यांनी."

"बरं, उरलेलं कचऱ्यात टाकायची आपली संस्कृती नाही. अन्नाला आपण पूर्णब्रम्ह म्हणतो."