शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

VidhanSabha Election: कोल्हापुरात काँग्रेसकडे आठ जागा घ्या, पुण्यातील बैठकीत सतेज पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 11:58 IST

दहाही मतदारसंघांचा घेतला श्रेष्ठींनी आढावा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आठ मतदारसंघांत काँग्रेस पक्षाने तयारी केली आहे. या जागा पक्षाकडे घ्या, असा आग्रह काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी धरला.पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांची आढावा बैठक बुधवारी पुण्यात काँग्रेस कार्यालयात झाली. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील आदी उपस्थित होते.दहा विधानसभा मतदारसंघांच्या वतीने आमदार सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली असून दहापैकी आठ जागा लढण्याची आपली तयारी आहे. आघाडीच्या जागावाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्या. निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. कोल्हापुरातून आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष सचिन जाधव, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, ‘गोकुळ’चे संचालक प्रा. किसन चौगले, पंडितराव केणे, विश्वनाथ कुंभार, बाळासाहेब खाडे, शंकरराव पाटील आदी उपस्थित होते.

‘के. पी.’ समर्थकही बैठकीला उपस्थितमाजी आमदार के. पी. पाटील यांचे समर्थक पुण्यातील काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला उपस्थित होते. यावरून, ‘राधानगरी’ मतदारसंघावर काँग्रेस ताकदीने दावा करण्याची शक्यता आहे.‘कागल’, ‘शाहूवाडी’ सोडून सगळीकडे तयारीकाँग्रेसने गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘कागल’ व आमदार विनय कोरे यांचा ‘शाहूवाडी’ वगळता आठ मतदारसंघांत बांधणी केलेली आहे. त्यामुळेच आता मागणी करतानाही हे दोन मतदारसंघ सोडूनच ते मागणी करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील