Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 15:26 IST

'राजा शिवाजी' सिनेमाला U/A प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता थिएटरमध्ये हा सिनेमा सहकुटुंब सहपरिवार पाहता येणार आहे. 

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना कुटुंबासहित पाहता येणार आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाला U/A प्रमाणपत्र मिळालं आहे. त्यामुळे आता थिएटरमध्ये हा सिनेमा सहकुटुंब सहपरिवार पाहता येणार आहे. 

'राजा शिवाजी' सिनेमाला सेन्सॉर बोर्डकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे. U/A प्रमाणपत्रामुळे हा सिनेमा आता लहान मुलांनाही पालकांसोबत थिएटरमध्ये पाहता येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास आता लहान मुलांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. येत्या १ मे रोजी 'राजा शिवाजी' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या ट्रेलर आणि त्यातील गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

'राजा शिवाजी' सिनेमाचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून या सिनेमात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. १०० कोटींचं बजेट असलेला मराठीतील हा पहिलाच भव्यदिव्य ऐतिहासिक सिनेमा आहे. सिनेमात बॉलिवूडकरांची फौज पाहायला मिळणार आहे. 

'राजा शिवाजी'ची स्टारकास्ट

'राजा शिवाजी' सिनेमात जिनिलीया देशमुख राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. अभिषेक बच्चन शिवरायांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले यांची भूमिका साकारणार आहे. संजय दत्त अफजलखान, विद्या बालन बडी बेगम, फरदीन खान शाहजहान, बोमन ईराणी पीरबाबा, भाग्यश्री राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी, शिवानी मुंढेकर हे मराठी कलाकारही झळकणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Raja Shivaji Film Receives U/A Certificate, Family Audiences Can Now Experience the Epic

Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' receives a U/A certificate, allowing families to watch the historical epic together. The film, directed by and starring Deshmukh as Shivaji Maharaj, features an ensemble Bollywood cast and is set to release on May 1st. The trailer has already garnered positive responses.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा